क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चिंचपाडा येथे संपन्न

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 18 ऑगस्ट 2024 रविवार रोजी वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे आयोजित करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष व माजी प्राचार्य, सार्वजनिक हायस्कूल,विसरवाडी आदरणीय श्री ओ. एस. खलाने सर यांच्या अध्यक्षतेखाली रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय नेते, सैनिक जवान, सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सभासदांच्या दिवंगत नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्येची देवता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी व बारावीत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या सभासद पाल्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.सभेत मा.श्री चव्हाण सर, शिंपी सर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री न्हाहळदे सर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास आदरणीय गांगुर्डे सर सौ.माळी मॅडम,श्री खलाणे एस जी सर ,शिरसाळे मॅडम,शिंपी सर,डी आर माळी,आर.आर.गावीत सर इ .मान्यवर उपस्थित होते तसेच आदरणीय श्री जी.बी.पाटील सर,वळवी व्ही.एन, वळवी पी.आर, श्रीमती गारोळे मॅडम,श्री.येवले सर इ.सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते. त्यांचाही सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.
       नवापूर तालुक्यातील मुख्याध्यापकही सभेस उपस्थित होते.वनवासी विद्यालयातील श्री.पी.एम.चिंचोले,श्री.खैरनार सर,दापूर,श्रीमती गावीत मॅडम शेही सभेस हजर होते.पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री कैलास न्हाहळदे,सचिव श्री.येवले सर,संचालक मंडळातील श्री.एच.आर.पाटील,वसावे सर,भोसले सर,गवळी सर,गारोळे मॅडम,वसावे मॅडम,जी.बी.पाटील सर,मावची सर उपस्थित होते.
      त्यानंतर मागील सभेच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.अहवाल वाचन,तेरीज व नफातोटा पत्रक, ताळेबंद इ.विषयांवर श्री.येवले सरांनी सादरीकरण केले.
         अध्यक्षीय भाषणांत श्री.ओ.एस.खलाणे सरांनी सांगितले की १९९९ साली कर्मचाऱ्यांना बॅंक सहजासहजी कर्ज देत नव्हते.त्यावेळेस कर्मचाऱ्यांना पैशांसाठी खूप वनवन भटकावे लागत होते. शिक्षकांना दुकानदार सुद्धा उधार देत नव्हते.कर्मचाऱ्यांना लागणारा वैद्यकीय खर्च, बांधकाम व इतर तत्कालीन खर्चासाठी कुठलीही तरतूद नसल्यामुळे मी विचार केला आणि जून 1999 मध्ये  पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली त्यावेळेस शंभर रुपये सभासद वर्गणी होती.व कर्ज मर्यादा दोन हजार रुपये होती आज वर्गणी 3000 रुपये व कर्ज मर्यादा दहा लाख रुपये हा वटवृक्ष बघून मला अतिशय आनंद होत आहे मी लावलेलं छोटसं रोपटं आज वटवृक्ष झालाय याचा मला परमानंद होत आहे.असे वक्तव्य संस्थापक अध्यक्ष श्री ओ.एस. खलाणे सरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हेमंत पाटील सरांनी केले व सूत्रसंचालन प्राध्यापक श्री आर.डी. सोनवणे यांनी केले सर्व सभासदांना चांदीचे नाणे संचित नफ्यातून देण्यात आले. लाभांश वाटप करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post