KYC साठि सकाळपासून महिलांचा बॅकेत रांगा , बॅकेत काउंटर वाढविण्याची मागणी, इतर कामांसाठी अडथळा

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    सध्या राज्यात  मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी योजनेचा शुभारंभ झाला असून या साठी नवापूर शहरातील सर्वच बॅकांमध्ये महिलांच्या सकाळपासून रांगा लागत असुन जणु एखादि वरातच बॅकेत उतरली आहे असे दृश्य दिसत आहे या गर्दिमुळे इतर ग्राहकांना आपल्या कामासाठी अडथळा निर्माण होत आहे.
      शहरातील भारतीय स्टेट बँके,युनीयन बॅक व महाराष्ट्र बॅक या राष्ट्रीयकृत बँका असुन कित्येक महिलांचा खात्यात पैसे जमा न झाल्याने व KYC नसल्याचे या त्रुटी दूर करण्यासाठी महिलांची एकच गर्दी जमा होत असुन अगदि सकाळ पासून रांगांमध्ये उभे राहण्यासाठी बॅकेत येत आहे त्यातच एखादि त्रुटी असल्यास बॅक कर्मचारी उद्धट पणे वागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
    सकाळी सकाळी आपले काम लवकर पूर्ण होईल व आपल्या खात्यात पैसे जमा होतील या अपेक्षेने महिला बॅकेत येऊन रांगेत उभे राहण्यासाठी धावपळ करून येतात यात काही वयस्कर महिलाचा देखील समावेश आहे सकाळपासून उपाशीपोटी आल्याने व बॅकेत जास्त वेळ रांगेत उभे राहिल्याने चक्कर येणे व बी.पी.वाढल्याने शारीरिक त्रास देखील होत आहे.
      या योजनेसाठी स्वतंत्र काउंटर वाढविण्याची मागणी होत असुन बॅक व्यवस्थापकांनी सहकार्य करावे अशी मागणी केली जात आहे जेणेकरून इतर ग्राहकांना याचा त्रास होणार नाही व कामांना अडथळा येणार नाही परंतु बॅक व्यवस्थापनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने त्यांना देखील अडचणी निर्माण होत आहे त्यासाठी शासनाने या विषयावर तोडगा काढुना ग्राहकांना समस्या मुक्त करण्यासाठी पाउल उचलून ग्राहकांची सोय करावी अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post