आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात केस गळणे व टक्कल पडणे या विषयावर डॉ.एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी

नाशिक सत्यप्रकाश न्यूज 
 आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
    विषय - केस गळणे.टक्कल पडणे व सुदृढ आरोग्य. 
मी हिरामण जोशी,वय ६० वर्ष.भगवंत मंदिर जवळ.मेन रोड. बार्शी.
     माझे रोज केस गळतात.आता टक्कल पडत आहे.खाज येते.या
विषयावर माहिती लिहावी.
     सर, आपल्या वयोमानाप्रमाणे डोक्यावर केसांना टक्कल पडणे.
हे एक नैसर्गिक आहे.पणं तरीही
काही व्यक्तीमधे कोणत्या कारणाने टक्कल पडत आहे.हे तपासणे महत्त्वाचे आहे.
        प्रथमतः वयाप्रमाणे केसांची वाढ होतांना शरिरात ताणंतणाव.
वैचारिकपणा.स्वभाव,वागणे,बोलणे.आत्मिक समाधान,टेन्शन,आहा
र,विहार.यांच्यामधे काही कमीजा
स्त असल्यास हार्मोन्स डेव्हलेपमेंट 
च्या अभावामुळे डोक्याच्या वरच्या भागात केस आपोआपच विरळ व पातळ होतात.आणि टक्कल पडण्याची सुरवात होते.यालाच फ्रंटल फायब्रोसिंग एलोपेशिया असे म्हणतात.हे स्रियांमधे अति जास्त प्रमाणात असते.कधी पाळी
जाण्याचा वेळी मेनोपाँज मधे हार्मोन्स बदलतात .मनात विचार.
ताणंतणावं.संताप,असमाधान इ.
कारणे.अथवा अनुवंशिकतेने आपोआपच केस गळतात.व टक्कल पडते.
       टक्कल पडण्याचे प्रकार
     १) डोक्याच्या वर गोलाकार व ठिसुळ ठिपक्यासारखे केस आपोआप गळतात.याला गळं किंवा चरी पडणे असेही म्हणतात.
हि कधी दाढी वा भुवयावर बारिक गोल स्वरुपात चरी पडते. तेथे केस
मुळापासुन उगवतं नाही.कधी त्या
जागेला खाज येते.थोड्या वेदना जाणवतात. व्रणसारखे दिसते.
      २) केस अचानक मोकळे होतात .-- वयाप्रमाणे शारिरीक वा भावनिक विचार,टेन्शन.व्हिटँमिन
अ वा क ची कमतरता झाली तर केस आपोआप गळतात,कधी केसांना शँम्पु,साबण,शिकेकाई लावुन हलक्या हाताने चोळल्यास.
कंगवा फिरविला तर केसांचा पुजं
का हातात नाही तर कंगव्यावर येतो.हे जेवणात प्रोटिन्स कमी.
सेक्स असमाधान.भावनात्मक जिवन जगणे.असे मानसिक आजार असले तर होते.
        ३) संपुर्ण शरिराचे केस गळणे -- शरिरातिल काही दिर्घायु
षी आजार,उदाः- क्षयरोग,कँन्सर.
मधुमेह.गर्भाशयाचे आजार .लोह कमी,हिमोग्लोबिन कमतरता.कधी कँन्सर आजारामधे केमोथेरँपीमुळे
डोक्यावरिल केस गळतात.
      ४) कधी वयाप्रमाणे सुरवातीला काही पांढरी दिसणारी केसांना बाहेरिल केमिकल,हर्बल मेहंदी.टाटाचे केस काळे करणारे केमिकल्स सतत लावली तर केसा
ना खाज येते.व केसांची मुळं हलके होऊन गळतात.
       ५) शरिरात पाळी येतांना वा जातांना इस्ट्रोजन कमी जास्त होते
त्यामुळे थाँयराँईट व इन्सुलिन सार
ख्या समस्या निर्माण होतात.अश्या
वेळी हाँर्मोन्स असंतुलित होते.हे जास्तीतजास्त महिलांन मधे होते.कारणं ताणंतणाव.विचार,
यामुळे केस गळतात .
       ६) संप्रेरक हाँर्मोन्स असंतुल
न --- मुलगा पुरुष होतांना वा मुलगी वयात येतांना शरिरात वेगवेगळ्या ग्रंथीची वाढ होते.त्यामु
ळे आवाज बदलणे.पुरुषांना दाढी,मिशी येणे, आपोआप होते.
पणं कधी अनुवंशिकतेमुळे काही व्यक्तीना केस कमी प्रमाणात येतात.
      ७) काही आजार झाल्यानंतर घेतलेल्या औषधी उदाः पेन किलर
.स्टेराईड.सतत अंग दुखणे.डोके .
सांधे दुखणे यावरिल गोळ्या सतत
घेतल्या तर केस गळतात.
      ८) आपली जिवनशैली नेहमी 
व्यस्त असली तर डोक्यावर स्ट्रेस ,
तणावं वाढतो.आणि काँर्टिसाँल 
स्ट्रेस हाँर्मान्सचे प्रमाण शरिरात 
वाढते.त्यामुळे टेस्टेराँन व एड्रेनाईल ची पातळी वाढल्यास टाळूवरिल केस गळतात.
       ९) टक्कल पडणे हे एक 
अनुवंशिकता कारण असते.
     १०) एखाद्या घराण्यात नेहमी तमोगुणी पदार्थ उदाः- मसाला.
मटन.चिकण.हि.मिरच्या .खाणे.व्यसन ड्रिक्स.तंबाखू ,चूना,बिडी.मुळे डोक्यात सतत घाम येऊन कोंडा .बुरशी इन्फेक्शन त्वचा विकार होऊन सतत खाज सुटते.खाजवल्यावर केंसाची मुळे हालतात.मग केस सहज गळतात.
टक्कल तयार होते.
        ११) केस रचना सुव्यवस्थित नसली.अथवा भांग केस अति ओढून पाडाणे त्यामुळे केस दुभंग
तात.मग दुसऱ्या दिवशी केस विचं
रली तर केस तुटतात.
       १२) अशक्तपणा ,व्हिटँमिन कमी,लोह कमतरता.दिर्घआजार.
भूक लागत नाही.अति विचार.
टेन्शन.व्हिटँमिन अ व क कमी होणे.शारिरीक दुर्बलता,यामुळे केस गळतात.टक्कल पडते.
      १३)लठ्ठ पणा --शरिरात चरबी
मेदोग्रंथी,फँट् स वाढणे,हे,वय वाढले तर  चरबीयुक्त आहार घेतला तर HFD वाढते.डोक्यामागे केस गळतात.टक्कल वाढते.
       १४) केस गळतांना टक्कल पडले तर कंगवा कमी प्रभावी होतो.
       १५)टक्कल पडल्यावर विंग वापरतात . हा कृत्रिम किंवा नैसर्गिक केंसाचा थर असतो.तो व्यक्तीच्या चेहरा शैलीप्रमाणेच बनवला जातो.बाजारात यांची किंमत थोडी जास्त असते.त्यामुळे ठराविक प्रसंगी तो गरजेनुसार वापरावा लागतो.बरेचसे स्रियाँ व पुरुष वापरतात.
            उपचार
    केस गळणे वा टक्कल पडणे हे वयोमानाप्रमाणे होणारी नैसर्गिक  प्रक्रिया आहे.आजकाल केसरोपणं करण्यासाठी बरेच हाँस्पिटल व दवाखाने आहेत.तात्पुरता काही दिवस फरक पडतो.काही व्यक्ती विंग ही वापरतात. हि एक शारिरीक डिफिशियन्सी आहे.ते आपल्या स्वभाव .विचार.घरातील ताणंतणावं,असमाधान.यावर अवलंबून आहे.
      शेवटी केस गळु नये .यासा
ठी तिन औषधांचा उपयोग सांगतात.-----
     १) मिनोक्सिडिल.
     २) फिनास्टेराँईड.
     ३)ड्यूटास्टेराँईड.
  खरं :- म्हणजे यासाठी कोणत्याही औषधी उपयोगी नाहीत.
----------------------------------------------------
  विषय - सुदृढ आरोग्य ?
     मानवी शरिर सुदृढ म्हणजे काय ? नेहमीच निरोगी कसं राहु शकतो ? आजारपण नको यावयास पाहिजे ? यासाठी काय करावे ?
     प्रश्न - सौ.सोनाली वाघ.घोटी.
       आपणं कधीही फक्त शरिराने
तंदुरुस्त असुन उपयोग नाही. तर त्यासाठी मनाचाही मोठेपणा पाहिजे असतो.बाहेरुन चांगले दिसणे,किंवा चांगले कपडे परिधा
न करुन ,वरुन सेंट अत्तर मारुन रुबाबदार व्यक्तीमत्व दाखवण्यापे
क्षा दुसऱ्याला समजवुन घेणे.नेह
मी परोपकार करणे अशी भावना मनात ठेऊन सहकार्य करणे,असे मनातिल सकारात्मक विचार असल्यास आपोआप शरिराला सुदृढता मिळते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताणतणावं ,विचा
र.टेन्शन.जास्तचे विचार केल्यास मन अस्वस्थ होऊन पचनसंस्थेवर परिणाम होऊन बध्दकोष्टता वाढते ब्लडप्रेशर वाढुन मानसिक त्रास हो
तो.म्हणून शरिर सुदृढ होत नाही.
      कधीही ,केव्हाही जिवनातिल गेलेल्या,घडलेल्या मागिल घटनाचा
 ,गोष्टीचा मनात तोच तो विचार करु नये.अनुभवाने माणूस मोठा होतो.पणं झालेली चुक पुन्हा कधी
 करायची नाही.याची सतत काळ
जी घ्यावी. कारणं जास्त विचारांनी भूक लागत नाही.मानसिक नैराश्य
निर्माण होते.
      जिवनात आपले कर्तव्य / कामं महत्त्वाचे आहे.आपले कामे वैयक्तिक रोज आपणच करावी.
सतत मेहनत.आँफीस,कंपनी.वा शेतातिल,घरातिल सर्व कामे स्वतः करावी.त्यामुळे व्यायाम होतो.
शरिरातिल स्नायू बळकट होतात.
कधीही अति लोभी होऊ नये.पैसा
धन.धान्ये याची जास्त अपेक्षा ठेऊ नये,कुणाचा हुसरेपणा /बरोबरी आपणं करु नये,हे विश्व,जग,शेजा
री,मित्र ,नातेवाईक,आप्तेष्ट कुठेही जाऊ द्या.आपणं मन प्रफुल्लित,
समाधानी,हसरे.ठेवावे.आपणं आपल्या परिस्थितीने जिवन जगावे,दुसऱ्याची बरोबरी कधिही करु नका.स्वतः प्रामाणिकपणे 
शून्यातून विश्व निर्माण करा.जगतां
ना विश्व निर्माण करावे.यासाठी धनसंचय हि प्रवृत्ती मनात ठेवा.
पैश्यांना जिवनात फार महत्त्व आहे.माणसाला किंमत नाही,असे आपणांस सहज करता येऊ शकते
यासाठी मनापासून शरिर सुदृढ पा
हिजे असते.कधीही आपणंच आप
ली क्षमता औळखावी.आपल्या क्षमतेला खतपाणी देऊन आकाशा
त उंच भरारी मारु नका,याला बढा
ईखोर म्हणतात.माणसं दुरुन आपणांस ओळखतात.कर्तव्ये शून्य पणं तोडांत वायफळपणा
जास्त असतो.
         मन आणि शरिर दोन्हीही उत्साही.निरोगी ,सुदृढ असतिल तर व्यक्ती कुठल्याही वयात चिरकालिन आनंदी राहु शकते,तो
सतत यौवनात जिवन जगू शकतो.
नेहमी झपकेदार.रंगित,सप्तरंगी
मौल्यवान ,चकचकीत कपडे ,वस्र
.सेंट,शक्यतो शरिरावर वापरु नये.जिवनात साधी रहाणी.उच्च 
विचारसरणी ठेवा.फार महत्त्वाची आहे.वयाप्रमाणे झोपेला महत्त्व द्या.दिवसंरात्र यामधे कमितकमी साडेसात तास झोप महत्त्वाचे आहे.पुरेपुर झोप नाही झाली तर पचनसंस्था बिघडते.बध्दकोष्टता
वाढते.शरिरात उत्सर्जन होत नाही
स्नायुमधे रक्तपुरवठा होत नाही.हातपाय.डोकं,कबंर दुखते.
वेदना होतात
       शरिरात रोज छत्तिसशे उष्णता निर्माण होते.त्यासाठी व्यायाम ,फिरणे,सतत कामं करणे
महत्त्वाचे असते.विहार म्हणजे फिरणे अति महत्त्वाचे आहे.नेहमी बैठीकाम कमी करावे.हालचाल सतत करावी.आपले मानसिक विचार नेहमी सात्त्विक ,धार्मिक,
व्यावहारिक ठेऊन मनात चांगुल
पणा.दुरदृष्टी,सेवाभावीवृत्ती ठेवावी
नेहमी सकारात्मक जिवन जगावे.
दुसऱ्या विषयी आपल्या मनात चांगले आचार विचार ठेवावी .
कधीही आपल्या हातुन कोणाचेही
वाईट होणार नाही,याची काळजी घ्यावी.एखादे शुभकामाला जातांना सकारात्मक विचार ठेवा
घरातील देव्हार्यातिल देवांना,आई
वडिलांना नमस्कार करुन जावे.
सतत चेहरा हसतमुख ठेवा.
कपाळावर सतराशे आड्या ठेऊ नका.आपल्यामुळे कोणाचे कार्य सहज होणार असेल तर निश्चितच 
मदत करा,हे एक समाधान मिळते
कधीही स्वतः गर्विष्ट,शहाणे,बढाई
खोर वागू नका.त्यामुळे व्यक्ती संशयी,हरामखोर.व्यवहार शून्य वाटते,जिवनात स्वतः ची प्रगती खुंटते.आपणचं आपल्या पायावर दगडं पाडुन माणसापासुन आपोआपच दुरावतो.आपल्या मुखातून वाचा,बोलणे,सुंदर ,छान ठेवा.त्यामुळे जिवनात आपली प्रगती होईलच.नाराज होऊन पाया
वर कधिही दगड पाडून घेऊ नका.
आपल्या मुखातुन बोलणे हसत ठेवा. कुणी आपल्याकडुन दुखवणार नाही याची काळजी घ्या.आपले वय आणि उंची प्रमाणे वजन बेताचे ठेवा.फँट ,चरबी वाढवू नका...वाढल्यास फिरणे,व्यायाम करणे,लंघन करा,
रोज ५५ ते ६० मिनिट सकाळी ५ नतंर शतपावली करावी,आळसं,
कंटाळा करु नका.निश्चय ठेवा,यश मिळणारचं.थोडक्यात खाण्यासा
ठी जगू नका ! जगण्यासाठी खावे 
पोट भरले असेल तर आवडीचा पदार्थ खाणे अथवा उरलेले आहे म्हणून खाणे .हि मोठी चूक आहे.बाहेरील पदार्थ ,जंक फुड.तेलकट ,तळलेले चिकण,
मटन,ड्रिक्स अति घेणे हे चुकीचे आहे.मद्यपान,तंबाखू ,सिगरेट हे कधी घेऊ नये,वयाच्या पन्नाशी 
नतंर स्नायूची झिज होते.वजन कमी होते,क्षिणता येते,मासिक पाळी जाते,हार्मोन्स डेव्हलपमेंट होते,स्वभाव चिडचिडा,वजन वाढते.या स्थितीला सारकोपेनियाँ म्हणतात.दात ढिसुळ होतात.वात विकार होतो.मानसिक आजार होतात.तरी आपणं नेहमी बी पाँझिटिव्ह रहावे.वयाप्रमाणे शरिरा
चे स्थित्यतंर सुरु होते.एकाच गोष्टींचा सतत जास्त विचार,संताप करु नका.....हे ....जिवन आहे.
सकारात्मक विचार करा.मन व शरिर सुदृढ होत असते.
मार्गदर्शन डॉ एम.बी.पवार , विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक 
     
     

Post a Comment

Previous Post Next Post