नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथील 12 वी विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी चि. हार्दिक रवींद्र सांगळे याने बुद्धिबळ स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील संघात त्याची निवड होऊन तो आता विभाग स्तरावर खेळायला जाणार आहे .त्याला शाळेचे क्रीडाशिक्षक श्री मंगल पाटील सर व वाय. ए. सोमवंशी सरांचे मार्गदर्शन लाभले.
चि. हार्दिक हा श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल रविंद्र पी.सांगळे व सौ.शिला रविंद्र सांगळे यांचा सुपुत्र असुन चि.हार्दिक यांचे सर्वत्र अभिनंदन होत असुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत
Tags:
क्रीडा