आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात बालदमा.अँलर्जी . सर्दी. खोकला या विषयावर डॉ.एम‌.बी.पवार , विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक आ

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा,आजिबाईचा बटवा
विषय- बालदमा.अँलर्जी . सर्दी. खोकला.
       सौ.स्नेहा.आर.मोगल,पिंपळ
गांव.बसवंत.नाशिक. सर.या विषयावर माहिती हवी आहे .?
       दर वर्षी पावसाळा शेवटी जातांना भरपूर येतो.सरासरी भरुन हवामानात गारवा निर्माण करतो.त्यामुळे वृध्दापासुन लहानबाळांना अँलर्जी ,सर्दी,खोकला,
थंडी ,ताप तर कधी न्यूमोनियाँ,व अस्थमा निर्माण करुन आजारपण देऊन निघुन जातो,याला खरं तर बाळाची अथवा आपली प्रतिकार शक्ती कमकुवत असली तर सर्दी, खोकला,तापाचे इन्फेक्शन आपणांस लवकर होते.याला कारण अशक्तपणा ,सेन्सेटिव्ह स्वभाव अथवा अति रागिट व्यक्ती संतापी,शिस्तप्रिय.चिडचिडा माणु
स.गौर वर्णिय.उंच व्यक्ती यांना सतत अँलर्जी असते.याला कधी अनुवंशिकता असु शकते.थंड,गार हवामानात फिरणे,जाणे.फँन,एसी ची हवा यामुळे अश्या व्यक्तीना नेहमीच सर्दी.खोकला,ताप येतो .गार हवा,पावसाळ्यात लहान
मुलांना वारंवार श्वास घेण्यास त्रास होतो,छातित कफ होऊन श्वसनात
घर घर आवाज येतो.श्वासकष्ट होऊन बाळ लवकर झोपत नाही.अचानक ताप येतो.नाकात ओलसर सर्दी होऊन श्वास नेहमीप्रमाणे घेता येत नाही.रात्री रि  रि  करतो.रडतो. छातित कफ जमा होतो.खो
कला सततचा वाढतो.हे सर्व हवेत बदल झाल्यामुळे थंड हवेतप्रदुषण वाढल्यामुळे होते.वातावरणातील अँलर्जी हि काही विषाणू व्हायरसने होते.कधी बाळ अंगावर दुध पित असल्यास आईच्या सतत खाण्यात अंबट,थंड.गार.पदार्थ आली तर बाळाला कफ होतात.
 उदाहरणार्थ श्रीखंड .कढी दही, केळी,आईस्क्रिम,सिताफळ,चिज,
शिळे अन्न,या सारखे पदार्थ खाल्याने बाळास छातित कफ तयार होतात.त्यामुळेच सर्दी,खोक
ला,ताप येऊन अँलर्जी ब्रान्कायटीज विकार सतत होतो.
         लहान बाळाला वारंवार सर्दी,खोकला झाल्यास श्वासकष्ट होऊन अंग दुखणे,ताप येत असतो बाळ अचानक रात्रीचे रडते,बाळ झोपेत दचकते,झोपत नाही,रात्रंभ
र आईपप्पांना त्रास देतो.बाळाचं काय दुखतं .? हे कळतंच नाही. कारण बाळ रडत असतं .
   बाळाचे लहानपणाचे आजार
     १) सर्दी,कफ,खोकला.
     २)घश्यातिल गालगुंड.
      ३)गोवर आणि कांजण्या.
      ४) डांग्या खोकला.
      ५) माती खाणे.
      ६) व्हिटँमिन डी अभाव.
      ७) इन्फकँशनने ताप अचानक
      ८) अपचन,मोडशी,हागवणं
      ९) डी हायड्रेशन.जुलाब.
     १०)ताप अचानक झटके येणे.
      ११) बालदमा,खोकला.
   मोठ्या माणसांप्रमाणे लहान बाळास बालदमा होऊ शकतो,त्या
त पोट उडते,छातीत धडधडते,
याला डबा धरणे असेही म्हणतात 
सर्वसाधारणपणे बाळ दिडदोन महिन्याचे झाले तर नविन वातावर
णातिल बदलाने ऋतुमानाचा फरक त्याच्या शरिराला सवय करण्यासाठी प्रथमतः वेळ लागतो
म्हणून सर्दी,खोकल्याचे इन्फेक्शन होऊन कफ तयार होऊन छातित जमा होऊन ताप येतो.याच वेळी योग्य उपचार वेळेवर केला तर बालदमा होतच नाही.ती फक्त अँलर्जी असते,बाळ पाच ते दहा वर्षाचे झाले तर हा बालदमा आपो
आपच शरिरातुन नष्ट होतो.बाळ निरोगी होतो.परिपुर्ण वाढ होतांना फफ्फुसांची वाढ होते.प्रतिकार 
क्षमता वाढते.आणि बालदमा होत नाही.
          बालदमा - कारणे
    पावसाळा आणि हिवाळ्यात बाहेरिल वातावरणात सतत हवा थंड,गार असते . गार हवेत आँक्सीजनचे प्रमाण कमी होत, जडपणा असतो,श्वासोच्छावास मोकळा होत नाही.गुदमरल्यासार
खे होते.श्वासकष्ट होऊन कफ शरिराबाहेर जात नाही.दम लागतो
अँलर्जीमुळे होते.
        कधी हा विकार अनुवंशिक
ता.स्वभावात चिडचिडपणा,रागिट
संतापी बाळास जास्त होतो.
        बालदमा - लक्षणे
        बाळाला वारंवार सर्दी होऊन शिंका येतात.नाक बंद होऊन श्वस
नास अडथळा येतो.ताप,थंडी येऊन,छातितुन कफचा आवाज घरघर येतो.श्वसन उथळ व जलद
होतो.खोकल्याची अधुनमधून 
उभळ येते.श्वास सोडतांना शिटी
सारखा आवाज येतो.पोट खालीवर होते.धाप लागते .दम लागतो .जास्त त्रास झाल्यास ओठ व हाताची त्वचा निळी पडते
वेळेवर डाँक्टराकडुन निदान नाही झाले तर न्यूमोनियाँ होतो.बालदमा हा बाळाची वाढ पाच ते वर्षात झाली.तर आपोआप बाळ निरोगी होतो.तरी सतत बाळाची काळजी घेणे प्रत्येक मातापित्याने घेणे. अति महत्त्वाचे असते.
             उपचार
    १) आपल्या फँमिली डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
    २) बालरोग तद्न्य डाँक्टरांना दाखवावे.
    ३) छातीचा एक्स रे करावा.
    ४) रक्त लघवी तपासावी.
    ५) घरातिल वातावरण उबदार.उष्ण ठेवावे.
     ६) बाळाला गार हवेत नेऊ नये
     ७)बाळाला जन्मापासून व्हँक्सिनेशन करावे.
    ८) प्रत्येक दिवशी अंघोळ करतांना डोक्यावरून पाणी टाकू नये.
    ९) बाळाला छातीला शेक द्यावा 
   १०) बाळास अंगावरुन पाजल्यावर छातीशी धरुन पाठीवरुन खाली हात फिरवावा.
    ११) बाळासाठी आईने गार. शिळे.थंड.अंबट.पिष्टमय  पदार्थ 
खाऊ नये.
     १२.) बाळाची योग्य वेळेस योग्य काळजी घ्यावी.सतत निरोगी ठेवावे.हसतखेळत रहावे.
    १३) बाळास कधीही रागवू नये.
    १४) बाळाला सतत सुसंस्कार. सुसंगत ,सुसंवाद करावे.
   मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक 

Post a Comment

Previous Post Next Post