शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था नेहमीच अग्रेसर - शितलबेन वाणी

विद्यार्थी कृतीप्रवण आणि विचारप्रवण होणे महत्त्वाचे – हेमंत लागवणकर   
नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    नवापूर एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शिक्षणातील नव्या प्रवाहांना अनुसरून वर्गअध्यापनात शिक्षकांनी कोणते बदल करावेत, कोणती अभिनव तंत्रे वापरावीत याचे मार्गदर्शन करताना भारत सरकारचा विज्ञान प्रसारासाठी देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विज्ञान प्रसारक श्री. हेमंत लागवणकर यांनी विद्यार्थ्यांना कृतीप्रवण आणि विचारप्रवण करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
      विज्ञान शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी यु. के. च्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे देण्यात येणारे दोन दिवसीय प्रशिक्षण नवापूर एज्युकेशन सोसायटीतर्फे दिनांक २७ व २८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था नेहमीच अग्रेसर असून अशा प्रकारचे अनेक उपक्रम भविष्यात हाती घेण्यात येतील, असा मनोदय संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी यांनी याप्रसंगी व्यक्त केला. संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी अनेकदा कला आणि क्रीडा क्षेत्रांत आपले नैपुण्य दाखवितात. तशीच भरीव कामगिरी त्यांनी विविध विज्ञानविषयक स्पर्धा परिक्षांमध्ये करून भविष्यात मुलभूत विज्ञानात आपले करिअर करावे, अशीही इच्छा शितलबेन वाणी यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
      हाजी इब्राहिमभाई कासमभाई आमलीवाला आणि डॉ. बालाभाई शाह मेमोरियल हॉल (सेंट्रल हॉल), नवापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाचा लाभ ५१ शिक्षकांनी घेतला. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीतर्फे घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक  श्री. हेमंतभाई शाह, श्री. रजनीकांतभाई मिस्त्री, श्री. जहीरभाई औरंगाबादवाला, श्री. परागभाई ठक्कर, श्री. कल्पेशभाई जोशी, श्री. राजुभाई अग्रवाल, प्राचार्य श्री. एम. एस. वाघ , प्राचार्य एस. एल. जाधव , प्राचार्या सिमरन दिवटे , श्री महेश पाटील, श्री. निलेश प्रजापत यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जयश्री के. चव्हाण यांनी, परिचय श्री. दर्शन अग्रवाल यांनी, सूत्रसंचालन श्रीमती यास्मिन फकीर यांनी आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती कल्याणी चित्ते यांनी केले. श्रीमती कमलबेन परीख  , श्रीमती मेघा पाटील, श्री. दीपक मंडलिक यांनी सहकार्य केले . सर्व विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने  कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post