सेवानिवृत्त शिक्षिका सरलाताई गामीत यांच्या तर्फे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप....

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालयात कै. गिरजी जेठ्या गावित (गिरजी दादा) यांच्या स्मरणार्थ शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती सरला जगदीश गामीत, इला गावित,विमल गावित   यांच्याकडून शाळेतील 100 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य  मिलिंद वाघ सर उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मेघा पाटील, ज्येष्ठ शिक्षक विजय कदम निंबुदास गावित सोनू गावित मीनाक्षी गावित प्रतिभा पगार,अमोल दिवटे आदी उपस्थित होते. 

               कार्यक्रमाचा प्रसंगी सरला गामित म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी गणवेश घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना शाळेत येणे कठीण वाटते अनेकदा शिक्षणात ही विद्यार्थी मागे पडताना दिसतात,असे होऊ नये यासाठी त्यांनी हा संकल्प केल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांना आपल्या उज्वल भवितव्यसाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले, संघर्षच माणसाला घडवतो असे प्रतिपादन त्यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल सरला गामीत यांचे आभार देखील मानले.
               या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका भावना पाटील यांनी केले तर आभार शर्मिला गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post