तक्रार अर्ज निकाली काढून त्यावरील सुनावणी बंद केल्याच्या रागातून दोन महिला कर्मचाऱ्यांच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गेल्या गुरुवारी दुपारी घडला. दरम्यान, यावेळी संशयिताने शिक्षण उपसंचालक आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत कर्मचाऱ्यांना अॅसिड टाकून जिवे ठार मारण्याची धमकी देत धुडगूस घातल्याचा प्रकार घडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील रामशेज शिक्षणसंस्थेतील शिक्षकांना नाशिक पालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकाऱ्यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यतेच्या विरोधात आणि इतर बाबींच्या विरोधात प्रवीण सीताराम महाजन यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दिलेली होती. मात्र, त्रयस्थ व्यक्तींकडून होणाऱ्या तक्रारींची दखल घेऊ नये आणि अशा तक्रारी
निकाली काढाव्यात, असे उच्च न्यायालयाचे संभाजीनगर खंडपीठाचे यापूर्वी झालेल्या आदेशाच्या आधारे नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी या आदेशांचे पालन करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी आणि
कर्मचान्यांना सप्टेंबर २०२४ मध्येच दिलेले होते.
या आदेशानुसार प्रवीण महाजन यांचा अर्ज वरिष्ठ लिपिक राजेंद्र जगताप यांनी निकाली काढून त्यावरील सुनावणी बंद केली होती. या प्रकाराचा प्रवीण महाजन यास राग आला. त्यामुळे महाजन याने गुरुवारी दुपारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात आरडाओरडा करून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धुडगूस घातला. आपला तक्रार अर्ज नेहमी निकाली काढला जातो, असा आरोप करून महाजन याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमकावत शासकीय कामात अडथळा आणला. तसेच शिवीगाळ करून दोन महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केला.
**********************************. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी बरोबर कर्मचारी यांनी ही काळी फित लावून कामकाज सुरू केले...ज्या आरोपीने शिवीगाळ केली त्या आपल्या महिला अधिकारी व कार्यालयातील लिपिक महिला भगिनींना देखील टार्गेट केले...तसेच शिक्षणाधिकारी वर्धा च्या राऊत मॅडम यांचा ही अपमान केला आहे... कर्मचारी यांचा ही अवमान झाला आहे...
डॉ मच्छिंद्र कदम.
सहसचिव तथा उपाध्यक्ष शिक्षण सेवा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी संघ
Tags:
शासकीय