भूभर्गातील आवाजबाबत भीती न बाळगण्याचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांचे नागरिकांना आवाहन

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    तालुक्यातील मोजे खोकसा, दापूर, करंजी बु, उचोमौली इ. गावात व परिसरात 2 ऑक्टोबर 2024 पासून भूगर्भातून भुकंप सदृश्य आवाज येत असलेबाबत माहिती मिळालेवरुन सदर भागात तहसिलदार नवापूर, सहा. पोलीस निरीक्षक विसरवाडी, मंडळ अधिकारी व तलाठी हे नियमित भेट देण्यात येऊन परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, नागरिक, शाळामधील मुख्याध्यापक व शिक्षक यांचेशी संवाद साधत माहिती घेण्यात आली.
    आज गांधीनगर  येथील भुकंपमापक यंत्रणाकडील प्राप्त माहितीनुसार नवापूर तालुक्यात दि.02.10.2024 रोजी ठीक सायंकाळी 06:19 वाजता 2.3 तीव्रता व दि.04.10.2024 रोजी रात्री 10:18 वाजता कडवान परिसरात 2.2 तीव्रता (40 कि.मी.) व दि.05.10.2024 रोजी रात्री 01:39 वाजता 1.2 तीव्रतेच्या धोक्याची नोंद झाली आहे. सदरच्या तीव्रतेचे धक्के हे अतिशय सौम्य प्रकारातील असून यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याबाबत तसेच काळजी घेण्यावाचत प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
  सदरच्या आवाज व कंपनाबाबत मा. जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदुरबार, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण विभाग व नाशिक येथील भुकंपमापन संस्था यांना कळविण्यात आले आहे.
  वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्व्हेक्षण विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दि.04.10.2024 रोजी गावांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण विभाग व नाशिक येथील MERI संस्थेतील वैज्ञानिक दि.06.10.2024 व दि.07.10.2024 रोजी परिसरातील सर्व गावांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तसेच गावातील नागरिकांना सदरच्या परिस्थितीच्या अनुषंगाने प्रबोधन व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने अहवाल सादर करणार आहेत.सदर घटनांबाबत मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व नागरिक यांचे संपर्कात आहेत. तसेच ग्रामस्थांना आपल्या भागात बोरवेल पाणी पातळी कमी होणे, बोरवेलचे पाणी बाहेर येणे, जमिनीला भेगा पडणे, इत्यादी बदल निदर्शनास आल्यास तात्काळ प्रशासनास कळविण्यात यावे. मौजे खोकसा, दापूर, करंजी बु. व परिसरातील नागरिकांनी भयभीत न होणेबाबत प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत काही संपर्क करावयाचा झाल्यास श्री. दत्तात्रय जाधव, तहसिलदार नवापूर (मो.नं. 7588604285) संपर्क करण्यात यावा.
   तरी सर्व नागरिकांना पुनश्चः आवाहन करण्यात येते की, कुणीही सदर घटनांमुळे घाबरुन जाऊ नये. महसूल व पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत तरी परिसरातील नागरिकांनी भिती न बाळगण्याचे आवाहन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post