महात्मा गांधी विचार व संस्कार परीक्षा 2024-25 संपन्न

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
      येथील श्रीमती प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम.व्होरा कनिष्ठ महाविद्यालय् नवापूर येथे दिनांक 4 ऑक्टोबर 2024,शुक्रवार रोजी,महात्मा गांधी विचार व संस्कार परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर परीक्षेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या परीक्षेत एकूण 74 मुलींनी तर 86 मुलांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृती जोपासल्याबद्दल महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सौजन्याने सदर परीक्षेचे आयोजन करण्यात  येते.
सालाबादाप्रमाने सलग 16 व्या वर्षी महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून सदर परीक्षा शाळेत आयोजित करण्यात   आली.सदर परीक्षेत विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारित मिळालेल्या पुस्तकांचे वाचन करून परीक्षेला सामोरे जावे लागते.दरवर्षी या परीक्षेमध्ये विद्यार्थी जिल्हास्तरावर देखील यशस्वी होत असतात. यावर्षीही सदर परीक्षा ही एकूण सहा वर्ग खोल्यांमध्ये आयोजित करण्यात आली.महात्मा गांधी विचार व संस्कार परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्यातील विचार चिंतन, मनन ,सत्यनिष्ठा, अहिंसा, देश प्रेम ,राष्ट्रभक्ती इत्यादी नैतिकमुले जोपासली जातात व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस या वाचनामुळे त्यांच्यातील सामाजिक, भावनिक ,सांस्कृतिक, मानसिक इत्यादी आंतरिक मूल्यांचे जतन व संवर्धन होते असे कौतुकास्पद उदगार नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विपिन भाई चोखावाला ,कार्याध्यक्ष शितल बेन वाणी उपाध्यक्ष शिरीष भाई शहा, सचिव राजेंद्र भाई अग्रवाल, कोषाध्यक्ष श्री सतीश भाई शहा यांनी व्यक्त केले.
सदर परीक्षेच्या आयोजन शाळेचे प्राचार्य श्री मिलिंद वाघ यांनी केले.तसेच उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे पर्यवेक्षक दीपक मंडलिक विभाग प्रमुख मेघा पाटील यांचेही परीक्षेला मार्गदर्शन मिळाले.डॉ. योगिता पाटील यांनी महात्मा गांधी विचार व संस्कार परीक्षेचे समन्वयक म्हणून काम केले
तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post