सार्वजनिक मराठी हायस्कूल मध्ये मतदार जनजागृती अभियान संपन्न..

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय,नवापूर येथे मतदार जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते 
             'मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो' या उक्तीप्रमाणे लोकशाही बळकट करणाऱ्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मतदारराजा जागृत करण्यासाठी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेतील आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे म्हणून नव- मतदार होणाऱ्या या विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व कळावे त्यांच्यात जागृती व्हावी या उदात्त हेतूने सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामार्फत नवापूर नगरीमध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या प्रसंगी प्रभात फेरीचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात आले असून रॅलीची सुरुवात ही सार्वजनिक मराठी हायस्कूलच्या प्रांगणातून प्राचार्य मिलिंद वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. रॅलीचा मार्ग हा गांधी पुतळाहून - सरळ लाईट बाजार गल्ली- आंबेडकर पुतळा- नगरपालिका मार्गे - डायमंड हॉटेल- शितल सोसायटी - शालेय प्रांगणात रॅलीचा शेवट झाला. रॅलीतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या, घोषणा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, आपले मत आपले भविष्य, नर हो या नारी मतदान हे सबकी जिम्मेदारी, आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान इत्यादी घोषणांनी नवापूर शहरातील जनतेचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. रॅलीच्या शेवटी प्राचार्य मिलिंद वाघ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मतदानाचे महत्त्व सांगितले व नव-मतदार नाव नोंदणीचे अवाहन केले तसेच शालेय स्तरावर मतदान नोडल अधिकारी प्रा.दिनेश खैरनार यांनी निर्वाचन आयोग व संविधानातील मतदानाबाबत कलम याविषयी माहिती दिली व मतदान हे आपले कर्तव्य तसेच हक्क आहे ;याचा आपण वापर करावाच याविषयी सांगितले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी  प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे,पर्यवेक्षक दीपक मंडलिक व कनिष्ठ विभागाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातफेरीच्या यशस्वीतेसाठी निवडणूक साक्षरता मंच, शाळेतील BLO तसेच शाळेतील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन यशस्वी आयोजन केले.

Post a Comment

Previous Post Next Post