खोकसा, दापूर येथील भूकंप सदृश्य आवाजाची कारणे व त्यांच्यावरील शंकांचे MERI संस्थेतील वैज्ञानिकांनी केले ग्रामस्थांचे निरसन

नवापुर सत्यप्रकाश न्युज 
     तालुक्यातील मौजे खोकसा , दापुर उंचामौली , करंजी ई परिसरात काही दिवसांपासून भुकंपसदृश्य धक्के कंपन जाणवत होते.
   त्यानुशंगाने आज दिनांक ०७/१०/२०२३ रोजी नाशिक येथील MERI या संस्थेतील वैज्ञानिक श्रीमती चारुलता चौधरी मॅडम , श्री गिरासे  तसेच भुजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री बगमार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री बोरसे यांनी सदर गावांना भेटी देऊन पाहणी केली .
   तसेच खोकसा , दापुर व उंबर्डी येथील नागरिक, आश्रमशाळातील शिक्षक व विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांचेशी संवाद साधला.नागरिकांना भयभीत न होण्याचे आवाहन करण्यात आले .
      सदरचे आवाज , कंपन कश्यामुळे होऊ शकतात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सर्वांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
     यावेळी भूकंप निरसन वैज्ञानिक तसेच तहसीलदार दत्तात्रय जाधव व अधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post