महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेची शैक्षणिक दिनदर्शिका 2025 या कॅलेंडरचे नुकतेच अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना ही शासन नोंदणीकृत राज्यस्तरीय शिक्षक संघटना असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम करणारी एक संघटना आहे.त्यासोबतच ही संघटना शिक्षक व पदवीधरांसाठी विविध सामाजिक उपक्रम ही राबवते. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी शिक्षकांसाठी व शिक्षण क्षेत्रासाठी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते, या दिनदर्शिके मध्ये शिक्षकांच्या वर्षभराच्या सुट्ट्यां पासून ते सनावारां पर्यंत विविध कार्यक्रम, शिक्षक उपयोगी माहिती तसेच संघटनेने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा या दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येतो. यंदा या दिनदर्शिकेचे प्रकाशन अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज संस्थांचे १९ वी गादी चे मठाधिपती परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते धुळ्यात करण्यात आले.
संघटनेची दिनदर्शिका २०२५ लवकरच सर्व शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय व संस्थांना घरपोच पोहोच कऱण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले असून आज नवापूर तालुक्यातील दिनदर्शिका शुंभागीताई पाटिल व अॅड विवेक सूर्यवंशी यांनी आपल्या सुरत येथे एका वैवाहिक कार्यक्रमात जात असतानां नवापूर शहराची जवाबदारी पंडित बेडसे,सागर पाटील व प्रकाश खैरनार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे त्या प्रमाणे शहरासह तालुक्यातील प्रत्येक शाळेत दिनदर्शिका पोहचविल्या जाणार आहेत.
Tags:
सामाजिक