महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन या शिक्षक संघटनेची शैक्षणिक दिनदर्शिका 2025 या कॅलेंडरचे नुकतेच अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज यांच्या हस्ते धुळ्यात मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना ही शासन नोंदणीकृत राज्यस्तरीय शिक्षक संघटना असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम करणारी एक संघटना आहे.त्यासोबतच ही संघटना शिक्षक व पदवीधरांसाठी विविध सामाजिक उपक्रम ही राबवते. संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी शिक्षकांसाठी व शिक्षण क्षेत्रासाठी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते, या दिनदर्शिके मध्ये शिक्षकांच्या वर्षभराच्या सुट्ट्यां पासून ते सनावारां पर्यंत विविध कार्यक्रम, शिक्षक उपयोगी माहिती तसेच संघटनेने वर्षभर केलेल्या कामाचा आढावा या दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येतो. यंदा या दिनदर्शिकेचे प्रकाशन अमळनेर येथील संतश्रेष्ठ सखाराम महाराज संस्थांचे १९ वी गादी चे मठाधिपती परमपूज्य श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते धुळ्यात करण्यात आले. याप्रसंगी परम पूज्य प्रसाद महाराज यांनी संघटनेच्या संस्थापक तथा राज्याध्यक्षा शुभांगी ताई पाटील सूर्यवंशी यांनी शिक्षक व पदवीधरांसाठी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या भरीव कार्याचे कौतुक केले. व त्यांना भावी वाटचालीस साठी शुभआशीर्वाद दिले.
तसेच दरवर्षी या शैक्षणिक दिनदर्शिकेचे संकलन, शब्दांकन व फोटो रचना करणारे जळगाव जिल्हा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष(प्राथमिक) राजेश जाधव यांचे देखील यावेळी मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प. पू. सखाराम महाराज यांचा संघटनेच्या वतीने ॲड विवेक सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा जसपाल सिंह सिसोदिया , महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे राज्य संघटक प्रदीप चव्हाण , राज्य कार्यकारणी सदस्य वसीम अन्सारी , जळगाव जिल्हा माध्य.अध्यक्ष घनश्याम निळे , कार्याध्यक्ष दिनेश साळुंखे , प्रवीण बाविस्कर , भरत पाटील , जितेंद्र वाघ , डी आर पाटील , नितीन धनगर , प्रा महेंद्र बच्छाव , मीनाक्षी पाटील साधना भोईटे व संघटनेचे बहुसंख्या पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक