येथील श्रीमती प्र सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका श्रीमती कविता प्रकाश खैरनार यांनी विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी व तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लागावी यासाठी कृतीयुक्त उपक्रम यशस्वीपणे राबविला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शिरिषभाई शाह, मुख्याध्यापक मिलिंद वाघ , कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका मेघा पाटील , मध्यामिकचे पर्यवेक्षक दीपक मंडलिक, इंग्लिश विषयाच्या उपक्रमशील शिक्षिका कविता प्रकाश खैरनार, व जयश्री चव्हाण, गणेश लोहार, सी. एस पाटील, भरत सैंदाणे, डि. ए. अग्रवाल, अविनाश पाटील आदि शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री शिरीष भाई शाह यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले. तसेच इंग्रजी विषय हा जगाची खिडकी आहे असे म्हटले जाते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रगती करावी यासाठी इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढविणे हे आवश्यक असते असे त्यांनी मुलांना समजावून सांगितले. तसेच मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी देखील विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे हे आवश्यक असून हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी अशी आशा व्यक्त केली.
आज या डिजिटल युगामध्ये इंग्रजी हे प्रगतीचे अत्यंत प्रभावी साधन आहे. त्याचप्रमाणे इंग्रजी हे नोकरीची संधी देणारे करिअरचे दरवाजे उघडणारे तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयात आवड निर्माण करून प्रत्यक्ष जीवनामध्ये इंग्रजीचा वापर करावा यासाठी श्रीमती कविता खैरनार मॅडमांनी इंग्रजी विषयाचे कृतीयुक्त शिक्षण व्हावे यासाठी Go Fear, English Is My Dear हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या उक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रथम इंग्लिश व्याकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपल्याकडे येणारा विद्यार्थी हा अतीदुर्गम व मागासलेल्या भागातून येत असून या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इंग्लिश विषयाची फारशी अशी आवड नसते. त्यांच्या मनात इंग्लिश ची भीती बघायला मिळते. म्हणून अशावेळी या विद्यार्थ्यांच्या मनातून भीती काढून त्यांना इंग्लिश विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थी हित जाणून हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्लिश विषयाच्या शिक्षिका कविता खैरनार मॅडम यांनी इंग्रजी व्याकरणाचे मुद्दे देऊन विविध कृतियुक्त मॉडेल्स बनवून घेतले. मॉडेल्स बनविताना विद्यार्थ्यांनी स्वतः तो मुद्दा प्रथमतः अभ्यासला व त्यावर आधारित अतिशय उत्कृष्ट असे विविध प्रोजेक्ट्स व मॉडेल्स बनवून आणले. याव्यतिरिक्त इंग्लिश विषयाचे हस्ताक्षर सुधारणे, विद्यार्थ्यांना इंग्लिश चा वापर प्रत्यक्ष या डिजिटल युगात करता यावा यासाठी विद्यार्थ्यांना ब्लॉग्ज तयार करणे, ईमेल पाठविणे ह्या बाबी केवळ पुस्तकापुरता न ठेवता विद्यार्थ्यांकडून ब्लॉग्ज तयार करून घेतले, त्यांचा इ मेल पाठविण्याचा सराव करून घेतला. अशाप्रकारे कृतियुकत शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी कृतीयुक्त उपक्रम राबविण्यात आला.
Tags:
शैक्षणिक