नवापूर शहरात आज भव्य हिंदू मेळावा

.   नवापूर सत्यप्रकाश न्युज 
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा असलेला नवापूर शहरातील हिंदू मेळावा आज संपन्न होत असून समीतीचे कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.
    नवापूर शहरात भव्य हिंदू संस्कार मेळाव्याचे आयोजन समिर्ती तर्फे करण्यात आले आहे. हिंदू मेळाव्या निमित्त नवापूर शहर व तालुक्यात व गाव पाड्यांवर जनजागृती करण्यात आली आहे व मेळाव्या संबंधित माहिती देण्यात आली आहे. हिंदू मेळावा साठी जय्यत तयारी झाली असून शहरी व ग्रामीण भागात मुख्य ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत तसेच प्रसिद्धी माध्यमांना याद्वारे माहिती देण्यात आली आहे. आयोजकांतर्फे ठीक ठिकाणी सभा घेऊन मेळाव्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. हिंदू मेळाव्या साठी आयोजकांतर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. मेळावा दिनांक 12 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6 वाजता श्री शिवाजी हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आला आहे 
    यामेळावाचे वक्ते भारताचे सुप्रसिद्ध डॉ. श्री गौतमजी खट्टर राष्ट्रीय अध्यक्ष सनातन महासंघ यांच्या कणखर प्रखर हिंदुत्व विचारधारेच्या मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने श्री हनुमान मंदिर गांधी पुतळापासून सायंकाळी 5 वाजता निघणार आहे या हिंदु मेळाव्यात जास्तीत जास्त हिंदू बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू संस्कार मेळावा आयोजन समितीन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post