येथील मार्च संस्थेचा आदर्श प्राथमिक शाळेत नवापूर येथेशिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2 .0 ला सुरू असुन या प्रशिक्षणात मार्गदर्शक शिक्षकांकडून अतिशय सुंदर असे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच या प्रशिक्षणात जिल्ह्यातील शिक्षण औविभागातील अधिकाऱ्यांचे भेटि देत असुन पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला
रर्तुक शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रवीण अहिरे यांनी प्रशिक्षण स्थळि भेट दिली व उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांसोबत हितगुज केली अत्यंत खेळी मेळिचा वातावरणात व प्रश्न विचारले व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी देखील तेवढ्यात उत्साहात उत्तरे दिली या प्रशिक्षणात महिला शिक्षिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहुन महिला प्रशिक्षणार्थी चे कौतुक केले व प्रशिक्षण कसे उपयोगी पडेल हे समजावून सांगितले
तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना वळवी आणि डायटच्या प्राचार्य श्रीमती बेलन मॅडम यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शुभेच्छा दिल्या.
. या ठिकाणी सुलभक आणि तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आर .आर. देसले., रेखा पवार व प्रशिक्षणाचे केंद्र संचालक प्रमुख किशोर रायते यांनी उत्कृष्ट नियोजन केले. तसेच ज्या शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळा शिकत आहे त्यांचे आणि तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे व शाळेतील शिक्षकांचे कौतुक करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पुराणिक वनिता विद्यालय नवापूर व गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे यांनी केले. तालुक्यातील जिल्हा परिषद , खाजगी प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक याचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला 364 प्रशिक्षणार्थी व सुलभक 25 असे प्रशिक्षणार्थी उपस्थित असुन सदर प्रशिक्षणात जेवणासह चहा ,नास्त्याची उत्तम सोय करण्यात आल्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षकांकडून आयोजकांचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.
-------------------------------------------------- या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना योग्य अशी दिशा दाखवली जाईल या तसेच शिक्षक विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, सामाजिक आणि भावनिक शिक्षण देण्यास सक्षम होतील शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामुळे शिक्षकांना विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धती, सामाजिक आणि भावनिक शिक्षण, आणि उपकरणांचा प्रभावी वापर करण्यास मदत होईल. थोडक्यात या प्रशिक्षणाचा शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत होईल.
श्रीमती वंदना नानाभाऊ निकुंभे
उपशिक्षिका
तापी परिसर माध्यमिक विद्यालय अंजने
---------------------------------------------------- प्रशिक्षणामध्ये बऱ्याच विषयावर प्रशिक्षण दिले गेले त्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा त्यात पायाभूत स्तर शालेय शिक्षण त्यानंतर विद्यार्थ्यांची क्षमता आणि त्या क्षमतेवर आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया मूल्यांकन मूल्यमापन त्याचप्रमाणे या सर्व दिलेल्या विषयांची संकल्पना व त्यावरची पार्श्वभूमी आणि स्तरनिहाय स्वरूप सांगण्यात आले. त्याचप्रमाणे अध्ययन निष्पत्ती काय ती सुद्धा आपण त्यांच्या अध्यय आणि क्षमतेनुसार आपण ते ठरवू शकतो. . वर्गात सकारात्मक वातावरण कसे तयार करावे. आणि आता तंत्रज्ञानाचे युग आहे तर या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण विद्यार्थ्यांना एक आनंदमय अनुभव निर्माण कसा करावा? स्क्रीन समोर बसल्यानंतर त्याचा अतिरेक होणार नाही हे सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. की आम्हाला ज्या माहिती नाहीत त्या सुद्धा आमच्या कानावर कधी तसे शब्द पडले नाहीत ते सुद्धा आम्हाला येथे ऐकायला मिळाले.
खरोखरच या प्रशिक्षणाचा लाभ भविष्यात निश्चितच होणार आहे.
रागिनी संजय कुलकर्णी
उपशिक्षिका
श्रीमती प्र. अ.सोढा.सार्वजनिक मराठी.हायस्कूल आणि ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर.. शिक्षक
Tags:
शैक्षणिक