नवापूर सत्यप्रकाश न्युज
राज्यात आजपासून बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून काही दिवसांनी दहावीच्या परिक्षेला सुरुवात होईल शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून आपापल्या विषयाची तयारी सुध्दा करून घेतली असून परिक्षेला कडक वातावरण असावे व परिक्षा कॉपीमुक्ती व्हावी अशी पालकांसह शिक्षक व संस्थाचालकांची अपेक्षा असुन आजपर्यंत परिक्षा सुरळीत पार पडल्या आहेत.
या वर्षी मात्र शिक्षण विभागाने कडक नियम सुरू केले असून काही दिवसांपूर्वी एक आदेश जारी करण्यात आला की परिक्षेचा वेळी पर्यवेक्षक बदल करण्यात येईल जेणेकरून परिक्षा कॉपीमुक्त होतील परंतु या नियमाला शिक्षक संघटनानी विरोध केला कारण की शाळा करुन इतर ठिकाणी परिक्षेला जाणे हे शक्य नव्हते म्हणून हा नियम रद्द व्हावा यासाठी निवेदन दिलीत शिक्षक आमदारांचा देखील या नियमाला विरोध होता परंतु सर्वांचा संमतीने तो रद्द करण्यात आला.
परंतु ऐनवेळी जो दुसरा नियम काढला तो अत्यंत खर्चिक असते दोन शाळेतील प्रत्येक वर्गात सी सी कॅमेरा लावण्याचा आदेश काढला एकीकडे शासनाकडून संस्थांना कोणत्याही प्रकारचे अनुदान प्राप्त होत नसतांना सी सी कॅमेरा लावण्याचा आदेश हा खर्चिक असून प्रत्येक शाळेला तो न पुरवणारा आहे असे संस्था चालकांचे म्हणणे आहे तर ज्या शाळा मोठ्या आहेत त्यांना तर अशक्य आहे.कारण शाळेचे दहा वर्ग असले तरी दहा वर्गांना कॅमेरा लावणे म्हणजे कमीत कमी लाख रुपये खर्च करणे हा खर्च आणायचा कुठून असा प्रश्न संस्थाचालक व मुख्याध्यापकांना पडला कमी काळात असा नियम करणे हे अतिशय अवघड असते नियम चांगला जरी असला तो पाळणे आर्थिक दृष्ट्या कठीण आहे म्हणून सदर कॅमेरा चे बील शिक्षण विभागाकडे पाठवुन बीलाची मागणी करण्यात येईल असे मत संस्थाचालकांनी मांडले आहे जर सदर बील मिळाले नाही तर कायदेशीर मार्गाने लढू अशी प्रतिक्रिया नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला यांनी दिली असून त्याला शिक्षण विभाग किती न्याय देईल याकडे लक्ष लागले आहे.
Tags:
शैक्षणिक