ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षक, सनदी लेखापरिक्षकांसाठी दोन दिवसीय अधिवेशन तथा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले असून, हे अधिवेशन "येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी", नाशिक नगरीत संपन्न होत असल्याची माहिती संस्थेच्या नासिक शाखेचे प्रमुख तथा राज्यव्यापी ऑडिटर वेल्फेअर या संस्थेचे खजिनदार श्री संदीप नगरकर यांनी दिली.
अधिवेशनाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, की, राज्यातील तमाम प्रमाणित/सनदी लेखापरीक्षकांचे सन २०२५ मधील "राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण कार्यशाळा" राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच "तपोभुमी नाशिक" येथील, बीएपीएस, श्री स्वामी नारायण मंदिर (गेट नं. २), डेन्टल कॉलेजच्या मागे, मुंबई आग्रा रोड, तपोवन, पंचवटी, नाशिक-३. या ठिकाणी संपन्न होणार आहे.
राज्यातील ऑडीटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असो. महाराष्ट्र राज्य आणि सर्व सहयोगी जिल्हा संघटना यांचे वतीने शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी व शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी नाशिक येथे हे अधिवेशन संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून, मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील साहेब (मंत्री, सहकार व पणन महाराष्ट्र राज्य) व राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री दीपक तावरे साहेब(पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी, लेखापरिक्षकांना लेखापरिक्षणाचे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी,मा. श्री दिपकजी तावरे साहेब (सहकार आयुक्त तथा निबंधक पुणे)
मा. श्री. राजेश जाधवर साहेब, (अप्पर निबंधक, लेखापरीक्षण, सह. संस्था पुणे)
मा. श्री बाळासाहेब बडाख साहेब, (विशेष लेखापरीक्षक वर्ग १ फिरते पथक, पुणे)
मा. श्री अमोल गावडे साहेब, (कोकण विभाग अध्यक्ष, ऑडीटर कौन्सिल)
श्रीमती रूपाली घोलप, (कौन्सिल सभासद व मार्गदर्शक, प्रजापिता ब्रम्हकुमारी)
मा. श्री. चेतन बंब साहेब, (प्रख्यात सनदी लेखापाल, नाशिक)
मा. श्री. एस बी पाटील साहेब, (निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव मंत्रालय)
मा. श्री. टी. एस. अकाली साहेब, (सहाय्यक धर्मादाय आयुक्त १, नाशिक)
मा. श्री. संभाजी निकम साहेब
(विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नाशिक विभाग)मा. श्री. फयाज मुलाणी साहेब(जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक)मा. श्री. अविनाश पाटील साहेब
(जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था वर्ग १, नाशिक) मा. श्री. जितेंद्र निगडे साहेब ;विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण) नाशिक
मा. श्री. संदिप जाधव साहेब
(उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक)श्री. व्ही. आर. सोनुने साहेब(सहाय्यक धर्मादाय आयुक्त २, नाशिक) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत, उत्कृष्ट लेखापरिक्षकांना पुरस्कार वितरण करण्यात येणार असून,
या संपूर्ण "दोन दिवसीय अधिवेशनासाठी" जेवण, निवासासह रु.२५००/इतके शुल्क ठेवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री. रामदास शिर्के यांनी दिली.
ऑडिटर वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी संपूर्ण राज्यभरातून, मोठ्या संख्येने लेखापरीक्षक बांधव हजर रहाणार असून, या ज्ञानसत्रासाठी त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन श्री. दत्तात्रय पवार, (सहसचिव) श्री. आबासाहेब देशमुख, (उपाध्यक्ष), श्री. उमेश देवकर (सचिव)श्री. संदिप नगरकर (खजिनदार ) आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे
अधिवेशनाची नोंदणी रक्कम भरणा करणेसाठी, लेखापरिक्षकांनी, असोसिएशनच्या नावाने, आयसीआयसीआय बँक, शाखा केडगांव, अहमदनगर, बचत खाते क्र.३२४७०१०००४२०, IFSC-
ICIC0003247 यावर प्रवेश फी भरून त्याची माहिती "नाशिक जिल्हा प्रतिनिधींकडे" त्वरित सादर करावी असे आवाहन असोसिएशनचे विश्वस्त
श्री. बाळासाहेब वाघ,श्री. श्रीकांत चौगुले, श्री. संजय घोलप, यांनी केले असून, या अधिवेशनाच्या नांव नोंदणीसाठी काहीही अडचण असल्यास,लेखापरिक्षकांनी, ऑडीटर्स कौन्सिलच्या जिल्हा नियोजन समिती नाशिकचे पदाधिकारी श्री सुदाम निकम, (अध्यक्ष) मो. ९८२३१२३५८८श्री धनंजय शेळके, (सचिव) मो. ९७६४२७४९६१श्री दिपक पासलकर, (उपाध्यक्ष)मो. ९८९०१५०२८२सौ.विजया भदाने,( सदस्या) मो. ९८२२५०६२९२ यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे.
Tags:
अर्थविषयक