आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात गुलियन बूरी सिंड्रोम किंवा GBS या आजारा विषयी डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
  आरोग्य धनसंपदा ग्रुप आजीबाईचा बटव्यात 
   गुलियन बूरी सिंड्रोम किंवा GBS या आजार म्हणजे काय.
   सौ.अनघा तांबे.सापुतारा.
विषय - गुलियन बँरी सिंड्रोम अर्थात जीबीएस ह्या दुर्मिळ नवीन आजाराने राज्यात सह भारतातील आता शिरकाव केला आहे. आता ही पुणे व मंबुई
येथे ७४ रुग्ण आढळले.यापैकी चौदा रुग्णावर व्हेन्टिलेटर लावले असुन पैकी पाच रुग्णांना घरी पाठवले त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.हा एक भितीदायक विकार आहे.गुलियन बूरी सिन्ड्रोम म्हणजे काय ? हा का होऊ शकतो ? त्या
आजाराची लक्षणे कोणती ? आपण कोणती काळजी घ्यावी ?
उपाय आणि भविष्य विद्न्यान काय असते ? या विषयी आपणं थोडी माहिती घेऊ या ?
        हा विकार काही हजारो लोकांपैकी एकाला होवू शकतो.
ह्या आजाराचा विषाणू अथवा बँक्टेरियाँ इन्फेक्शन पसरतो. बहुतेक आजारामधे जर व्यक्तीची
प्रतिकारशक्ती कमी झाली असेल
तर त्या व्यक्तीच्या शरिरात हा विषाणू पटकन शिरकाव करतो.आपणं कधिही आपले शारिरीक व मानसिक आरोग्य . विचार.वागणे सतत निरोगी ठेवावे. इतर कोणत्याही आजारात शरिरात रोगप्रतिकारशक्ती कमी
झाल्यास व्यक्तीला मज्जासंस्थेच्या ऊती.पेशीवर न्युराँलाँजिक कमजोरी निर्माण होऊन नर्व्हस सिस्टीम अशक्त होते.अर्थात शरिरातील हातापायाच्या स्नायु
मधिल रक्तवाहिन्या कमजोर होऊन वाकडे.तिरपे पायहात होतात.चालतांना पाय संकुचतात. हातात संवेदना आपोआपच कमी होतात.बोलतांना बोबडी वळते. मग भुक लागत नाही.शरिरातिल हिमोग्लोबिन कमी.आणि पांढऱ्या पेशी वाढतात.वैचारिकता क्षिण होते.शरिराकडून मिळणारे सकेत कमीकमी होतात.आठवणं पडते. सतत थकवा येऊन हातापायात मुंग्या येऊन झिणझिण्या येतात. पाठ दुखते.श्वासोच्छवासाला त्रास
होतो.दम लागतो.झोप लागत नाही
         अचानक पायात व हातात
कमजोरी येते --- यात लकवा किंवा पँरँलँसिस होऊ शकतो.चाल
तांना अचानक त्रास होतो.शरिर कमजोर झाल्यासारखे वाटते.कधी
पातळ जुलाब.डायरियाँ.अतिसार
सुरु होतो. स्नायुत कमजोरी येते. गिळायला त्रास होतो.
         जीबीएस कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान बाळ आणि उतार वयातिल व्यक्तींना प्रामुख्याने होत असतो.हा दुर्मिळ विकार असतो .पण सतर्क रहाणे
महत्त्वाचे असते.
              उपाय
    प्रत्येक नागरिकाने पाणी गरम करुन प्यावे.घरातील हंडा.पिप. माठ.नेहमीच धुवून स्वच्छ करावा.घरात केरकचरा साठवू नये
घरासमोर पाण्याची डबकी.दुर्गंधी
नको.रोज ताजे.गरम अन्न खावे.फ्रिजमधिल शिळे पदार्थ निकस होतात.ते खाऊ नये. रस्त्यावरचे उघडे अन्न.मांस.कच्चे पदार्थ .पाणीपुरी.पिझ्झा.वडा.खाऊ नये.आपण वैयक्तिक स्वच्छता ठेवा.ताजे अन्न पौष्टिक .सात्विक
असते.त्याचा वापर करावा.बाहेर 
जातांना - येताना हाथ पाय स्वच्छ धुवा.नेहमी घरात वातावरण आनंदी .हसतखेळत ठेवा,नो टेन्शन.नो चिडचिडपणा,भरपूर गप्पा मारा.हसा.बोला.आपणांस कधी यापैकी काही लक्षणे आढळ
ल्यास आपण फँमिली डाँक्टरांचा अथवा  कोणताही मेडिकल तद्न्य
डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
       गुलियन बूरी सिंड्रोम हा एक स्वयंप्रतिकार विकार.आजार आहे.ज्यामधे परिक्षिय मज्जांतंतू आणि त्याच्या ऊती, पेशीच्या मुळामधे रोगप्रतिकार क्षमता म्हणजे अँन्टिबाँडिज आपोआप कमी होते.
         भयावह लक्षणे
     १) शरिरात वेदना होतात.
     २) शरिराची हालचाल होऊ शकत नाही.
      ३) मुत्राशय आणि आतडे यात
नियंत्रण कमी होते.
      ४)हृदयगती वेग कमी नाही तर जास्त ( ब्लडप्रेशर )
      ५) श्वसनाला अडथळा येतो.
     ६) डोळ्यांना दृष्टी अंधुक होते.
     ७) अशक्तपणा वाढतो.
     ८) भूक लागत नाही.
     ९) चालणे तिरपे तारपे वाकडे
     १०)वैचारिकता वाढते.
         शारिरीक तपासणी
     १) वैद्यकीय शारिरीक इतिहास डाँक्टरांना सांगावा.
     २)रक्त.लघवी.प्रोटिन .सेरेब्रल स्पायनल फ्ल्युड तपासणी करावी
    ३) विश्रांती करावी .
    ४)शरिरातिल हातापायांची ताकद तपासावी.
    ५) प्रथमतः काही दिवस निदान
होऊ शकत नाही.
              उपाय
       १) प्लाझ्मा एक्सचेन्ज -- रक्त
पेढीत जाऊन प्लाझ्मा बदलणे.
      २)डाँक्टरांच्या तपासणी प्रमाणे वेदना कमी करणारी औषधी घेणे.रक्तातगुठड्या न होणारी मेडिसिन घ्यावी.
     ३) कधीकधी फिजिओथेरँपी डाँक्टराचा सल्ला घ्यावा.
     ४) गुलियन बूरी सिंड्रोम आजार बरा होतो.वेळ लागतो. खर्चिक विकार आहे.
    ५)काळजी घ्यावी.घाबरु नये.
          

Post a Comment

Previous Post Next Post