नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील शहरातील धडधड्याकडून शात्रीनगर कडे येणाऱ्या रस्त्यावर लोखंडी रॉड ने बॅरिकेटिंग करण्यात आली होती परंतु गेल्या एक महिन्या आदी अज्ञात वाहनाने सदर लोखंडी बॅरिकेट तोडून टाकण्यात आले असून त्यामुळे शास्त्रीनगर नगर भागातील नागरिकांनी अवघड वाहनाचा त्रास सहन करावा लागत आहे
विशेष म्हणजे हे बॅरेकेटिंग महाराष्ट्र शासनाच्या गॅझेट पुस्तकात प्रकाशित झाले असतांना त्याला काढण्याचा प्रयत्न केला गेला जो कायद्याने गुन्हा आहे तरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचे परिसरातील नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
. नगरपरिषदेने सदर जागेवर दुसरे बॅरिकेट तात्काळ लावण्यात यावे असे आशयाचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले देण्यात आले जर बेरीकेटिंग लवकरात लवकर लावण्यात आले नाही तर स्थानिक नागरिकांकडून संवेदनशील मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरात नागरिकांनी दिला आहे .
निवेदनावर डॉ अनिल गावीत , राजेंद्र कासार , प्रशांत पाटील, मनोज बोरसे मनोज भांडारकर, हेमंत शर्मा,गोपी सैन, दिनेश खैरनार, पत्रकार प्रकाश खैरनार,संजय पाटील,शाम मावची सह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत.
या वेळी शास्त्रीनगर भागातील प्रकाश खैरनार, राजेंद्र कासार, दिनेश खैरनार, प्रशांत पाटील, मनोज बोरसे,मनोज भंडारकर, हेमंत शर्मा, गोपी सैन, भावेश पाटील आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags:
सामाजिक