तालुक्यातील सहकार चळवळीच्या केंद्रस्थानी असलेला डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची धुरा सहकार आयुक्तांनी पुन्हा एकदा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या हातात सोपविली असून, दुसरीकडे कारखान्यावर प्रशासकीय समिती नियुक्तीच्या आदेश स्थगित करण्यात आले आहेत.
नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर साखर संचालकांच्या आदेशादेने २६ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रशासक समिती नेमण्यात आली होती. या प्रशासकीय समितीला स्थगिती देण्यात यावी, यासंदर्भात सहकारी पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या मंत्र्यांनी ५ फेब्रुवारी २०२५ सहकार आयुक्तांना दिले. त्यानुसार सहकार आयुक्तांनी डोकारे साखर कारखान्याचे संचालक मंडळ निष्प्रभावित करून प्रशासकीय समिती नियुक्तीसंदर्भात साखर संचालकांनी २६ नोव्हेंबर २०२४ ला दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. वाशिवाय कारखान्याची धुरा पुन्हा संचालक मंडळाच्या हातात सोपविली आहे. त्या अनुषंगाने काल (दि.१३) कारखानास्थळी कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांनी कारखाना साईटवरील आई देवमोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags:
सामाजिक