राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन व कार्यशाळेचे २१ व २२ फेब्रुवारी रोजी देवगड येथे आयोजन सहकार मंत्री दिलीप वळसे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती

* १००० पेक्षा जास्त लेखापरीक्षकांची उपस्थिती राहणार प्रवेश शुल्क फक्त २०००
* सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती 
      कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
   राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन व कार्यशाळेचे
  २१ व २२ फेब्रुवारी रोजी देवगड येथे आयोजन सहकार मंत्री दिलीप वळसे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रमुख उपस्थिती
नगर – महाराष्ट्र राज्यऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांचे राज्यस्तरीय अधिवेशन, कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता राज्याचे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री दिलीप वळसे व महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. 
    यावेळी देवगड देवस्थानचे महंत हभप भास्करगिरी महाराज, हभप प्रकाशानंदगिरी महाराज, राज्याचे सहकार आयुक्त सौरभ राव व साखर आयुक्त अनिल कवडे आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे उपस्थिती असणार आहे.
   बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी या अधिवेशनाचा समारोप होईल, अशी माहिती ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी दिली. 
   दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर व ज्योती मेटे, सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर, सेवानिवृत्त अप्पर निबंधक एस. बी. पाटील, जिल्ह्याचे उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम, पुणे जिल्हा विशेष लेखापरीक्षक रावसाहेब जंगले, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते, विशेष लेखापरीक्षक पुणे सदानंद वुईक, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे आधी प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश देवकर यांनी दिली.
   या अधिवेशनास राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे १०००  हून अधिक लेखापरीक्षक उपस्थित राहणार आहेत. 
या अधिवेशनामध्ये राज्यातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने होणार आहेत. 
तसेच लेखापरीक्षकांच्या समस्यांवर चर्चासत्र होणार आहेत. 
       दोन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय अधिवेशनाचे नियोजन  ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर, विश्वस्त बाळासाहेब वाघ, श्रीकांत चौगुले व संजय घोलप आदी करत आहेत. 
   अहमदनगर जिल्ह्यात ही कार्यशाळा आयोजित होत असल्यामुळे, या अधिवेशनाला  जिल्ह्यातील जास्तीत जास्त लेखापरीक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऑडिटर कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग लांडगे, अहमदनगर जिल्हा ऑडिटर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, उपाध्यक्ष दत्तात्रय बोंबले, भाऊसाहेब वेताळ, सचिव राणी देवकर, सहसचिव विष्णू नेहे, विश्वस्त अतुल शुक्ल, परशुराम कोतकर, श्री. घोरपडे, श्री. भोकरे, श्री. दहातोंडे, आर. एल. शिंदे, श्री. नितीन डोंगरे, श्री वाळुंज, श्री. भास्कर वाकोडे, आदींनी केले आहे.
    राज्यातील सुमारे १००० च्या वर प्रमाणित लेखापरीक्षक या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून, प्रशिक्षण शुल्क नाममात्र रु.२००० ठेवण्यात आले आहे, यामध्ये नाश्ता, २ वेळचे जेवण, रहिवास, तसेच उपस्थित सदस्याला बॅग व उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती लेखापरीक्षक श्री नितिन डोंगरे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post