नाशिक येथे लेखापरीक्षकांचा अधिवेशनात उपस्थित राहण्याचे सचिव आबासाहेब देशमुख व उमेश देवकर यांचे आवाहन...

.    नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    येथे ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व प्रमाणित लेखापरीक्षक, सनदी लेखापरिक्षकांसाठी "दोन दिवसीय अधिवेशन तथा कार्यशाळेचे" आयोजन करण्यात आलेले असून, हे अधिवेशन "येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी", नाशिक नगरीत संपन्न होत असल्याची माहिती 
श्री .उमेश देवकर(सचिव ऑडिटर कौन्सिल) तसेच
कोपरगाव येथील प्रमाणित लेखापरीक्षक श्री नितिन डोंगरे यांनी दिली आहे.
या अधिवेशनाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, "राज्यातील तमाम प्रमाणित/सनदी लेखापरीक्षकांचे  सन २०२५ मधील "राज्यस्तरीय अधिवेशन व प्रशिक्षण कार्यशाळा" राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच "तपोभुमी नाशिक" येथील, बीएपीएस, श्री स्वामी नारायण मंदिर (गेट नं. २), डेन्टल कॉलेजच्या मागे, मुंबई आग्रा रोड, तपोवन, पंचवटी, नाशिक-३. या मध्यवर्ती ठिकाणी संपन्न होणार आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे 
   राज्यातील ऑडीटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असो. महाराष्ट्र राज्य ही संस्था प्रत्येक वर्षी लेखापरिक्षकांसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करीत असते. यामुळे लेखापरिक्षकांना सहकार कायद्यामधील नवनवीन सुधारणा, बदलांची माहिती मिळू शकते, शिवाय अशा कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी मान्यवरांकडून उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याने राज्यातल्या बहुसंख्य जिल्ह्यामधून  लेखापरीक्षक अशा कार्यशाळेसाठी आवर्जून उपस्थित रहात असतात.
 शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी व शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी "नाशिक" येथे हे अधिवेशन संपन्न होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून, मा.ना.श्री. बाबासाहेब पाटील साहेब (मंत्री, सहकार व पणन महाराष्ट्र राज्य) व राज्याचे सहकार आयुक्त मा. श्री दीपक तावरे साहेब(पुणे) हे उपस्थित राहणार आहेत.
   सदर अधिवेशनात राज्यातील सर्व लेखापरीक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वेल्फेअर असोसिएशनचे आबासाहेब देशमुख व उमेश देवकर यांनी केले आहे.
    



Post a Comment

Previous Post Next Post