कोपरगांवची श्री साई गावपालखीचा स्तुत्य उपक्रम.......

कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
   "तुमची-आमची-साऱ्या कोपरगावकरांची मानाची, सन्मानाची श्री साई गाव पालखी.."
या पालखी चे आपण सर्वच जण "भोई असलोत" तरी पण.. त्यात मनापासून राबणाऱ्या, झोकून देऊन, सेवा देणाऱ्या सर्वच "खंद्या युवकांना" मनापासून समस्त कोपरगावकरांचा सलाम!!!
"साई पालखी हा सामाजिक सेवेचा एक आदर्श दीपस्तंभ"
समाजसेवा ही केवळ एक जबाबदारी नसून, ती एक सतत जपली जाणारी भावना असते.
  कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळ आयोजित, "श्री साई गाव पालखीने", सामाजिक कार्याच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून, अनेक उपक्रमांद्वारे समाजहिताची ज्योत तेवत ठेवलेली आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे केवळ कोपरगावच नाही, तर इतर गावांनाही निश्चितच चांगली प्रेरणा मिळते हे नाकारून चालणार नाही.
सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम :
  "जिथे समाजहिताची ज्योत 
तेवत असते, तिथेच खऱ्या अर्थाने नाव घेतले जाते, 
श्री साई गावपालखीचे" !
"श्री साई गाव पालखी" या नावावर आजवर, अनेकविध सामाजिक उपक्रमांची नोंद झालेली बघायला मिळेल. 
सलग वर्षभर वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन ते करीत असतात. 
विशेष म्हणजे... 
इथे कोणीही मंडळाचे स्वयंघोषित अध्यक्ष नाहीत, की नाही कोणी पदाधिकारी. 
जे आलेत त्यांना सामावून घेतलं जातं.. 
सगळेच जण एका विशीष्ट ध्येयाने प्रेरित होऊन या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवीत असतात.आणि  आपले होऊन जातात.
मंडळाचे काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत :-
१) महिला सशक्तीकरणासाठी मोटरसायकल रॅली :
आत्मनिर्भरतेची नवी पहाट!
गुढीपाडव्याच्या मंगलमय पर्वावर मंडळातर्फे महिलांच्या भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले जाते. या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरतो. 
भल्या पहाटे कोपरगाव नगरीतील महिला, भगिनी, युवती अगदी नटून थटून, उत्स्फूर्तपणे "मोटार सायकल रॅली साठी" तहसीलदार कचेरी ग्राउंड वर हजर असतात. यावेळी, त्यांच्यातले चैतन्य, त्यांचा उत्साह, आणि तेज निश्चितच कौतुकास्पद ठरावे.
२) पहाट पाडवा : भक्तीगीतांचा सुरेल सोहळा-
गुढीपाडव्याच्या पहाटे, कोपरगावच्या वातावरणात भक्तिरसाची " सुरेल लय भरणारा" पहाट पाडवा हा कार्यक्रम मुंबादेवी तरुण मंडळाच्या पुढाकाराने साजरा केला जातो. भाविकांसाठी हा सोहळा केवळ संगीताचा आनंद देणारा नसून, तो त्यांच्या मनोबलाला नवी ऊर्जा देणारा असतो. गुढीपाडवा हा संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव असून, तो या मंडळाच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अधिक भव्य आणि मंगलमय स्वरूप धारण करतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्कृती, ही परंपरा केवळ या मंडळामुळे कोपरगावात जिवंत राहिलेली आहे,आणि त्यांच्या या कार्यात कोपरगाव ज्येष्ठ नागरिक मंचचे सहकार्य मिळत असते.
३) समाजहितासाठी विविध उपक्रम :
याशिवाय, मुंबादेवी मंडळ आयोजित श्री साई गावपालखीच्या वतीने, सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य सातत्याने सुरू असते. जसे की:
१) आरोग्य शिबिरे – गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार सेवा.
२) शिक्षण आणि मार्गदर्शन शिबिरे – विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती उपक्रम.
३) स्वच्छता मोहिमा – गाव स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी विशेष स्वच्छता अभियान.
"श्री साई गावपालखी – समाजासाठी एक आदर्श प्रेरणा"
हे  मंडळ केवळ कार्यक्रम आयोजित करून थांबले नाही, तर लोकांना समाजसेवेसाठी प्रेरित करण्याचे कार्यही सातत्याने केले आहे.  
युवाशक्तीला सुयोग्य दिशा देऊन,त्यांच्यात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यामुळे कोपरगावच्या संस्कृतीला आणि सामाजिक जाणीवेला नवे बळ, नवी दिशा लाभते आहे, मिळते आहे.
"श्री साई गाव पालखी"  हे केवळ एक संघटन नाही, 
तर समाजसेवेचे एक तेजस्वी उदाहरण आहे. 
  महिला सशक्तीकरण, भक्तीसंस्कृतीचा प्रसार आणि विविध सामाजिक कार्ये यांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण पंचक्रोशीत एक आदर्श निर्माण केला आहे.  
असे उपक्रम गावोगावी पोहोचावेत, हीच खरी "गुढीपाडव्याच्या नवचैतन्याची" ओळख ठरेल.
"समाजसेवेचा वसा घेतलेल्या तुमच्या-आमच्या-सर्वांच्या श्री साई गाव पालखीच्या एकून एक कार्याला शतशः प्रणाम आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!"
येत्या "गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर महिला सशक्तीकरणासाठी मोटरसायकल रॅली आणि कोपरगावच्या लोकांसाठी पहाट पाडवा भक्तीगीतांचा कार्यक्रम"  या दोन्ही उपक्रमांचे मनःपूर्वक कौतुक!
"गुढीपाडव्याच्या नवऊर्जेसह, प्रेरणादायी उपक्रम गावोगावी पोहोचू दे.. ही श्री साईचरणी प्रार्थना !"
याच निमित्ताने पंढरपूर येथील साध्वी प.पू.अनुराधादिदी यांच्या सुश्राव्य वाणीतून 
"श्री शिवमहापुराणाच्या" 
सुंदर प्रवचनाचा  लाभ समस्त कोपरगावकरांना मिळणार आहे.
वृत्त सहकार्य - नितीन डोंगरे,करसल्लागार, कोपरगांव 

Post a Comment

Previous Post Next Post