जीएसटी अभय योजना २०२४ बाबत सर्वसामान्य करदाते, व्यापारी, उद्योजक आणि करदात्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अहिल्यानगर आणि संगमनेर व अकोले शहरातील सर्व सीए व कर सल्लागार यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष कार्यशाळा आयोजित आज करण्यात आली. हॉटेल सेलिब्रेशन, संगमनेर येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील व्यापारी, कर सल्लागार आणि उद्योग जगतातील प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
शासनाच्या "अभय योजबेबाबत" सविस्तर मार्गदर्शन
या कार्यशाळेत GST विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्री. भगवान टी. उंडे साहेब – Dy. Comm. Of State Tax (Appeal), श्री. धनंजय महाडिक साहेब – Dy. Comm. Of State Tax,
श्री.दत्तात्रय एस. भिसे साहेब – Asst. Comm. Of State Tax उपस्थित होते.
या वेळी, जीएसटी कायद्यानुसार जाहीर झालेल्या "अभय योजनेनुसार" करदात्यांना मिळणाऱ्या सवलती, दंड व व्याज माफी, प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा यासंबंधी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन, त्यांच्या शंकांचे समाधान केले.
व्यापारी व कर सल्लागारांचा मोठा सहभाग
या कार्यशाळेत संगमनेर आणि अकोले तालुक्यातील व्यापारी, लघु व मध्यम उद्योजक, चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) आणि कर सल्लागारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. व्यवसायिकांना त्यांच्या प्रलंबित करप्रकरणांवर उपाय मिळावेत आणि शासनाने दिलेल्या सूट योजनेचा लाभ मिळावा, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
यावेळी व्यासपीठावर तीनही वरिष्ठ अधिकारी, तसेच ज्येष्ठ सीए बापूसाहेब टाक ,संगमनेर टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब आमटे साहेब उपस्थित होते.
GST अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – अधिकाऱ्यांचे आवाहन
GST Amnesty Scheme 2024 अंतर्गत करदात्यांसाठी मर्यादित कालावधीसाठी करदंड माफी आणि व्याज सवलत योजना उपलब्ध आहे. त्यामुळे करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संगमनेर व अकोले येथील सीए व कर सल्लागार संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.
वृत्त सहकार्य : -नितीन डोंगरे, करसल्लागार कोपरगाव
Tags:
अर्थविषयक