जातपडताळणीत कोणीही वंचित राहू नये - सी के पाडवी

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     समाज कल्याण विभाग नंदुरबार जिल्हा जात प्रमाण पत्र समिती मार्फत आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलतांना सहाय्यक संशोधन अधिकारी सी के पाडवी म्हणाले की, विविध जाती, त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व, जात पडताळनी प्रक्रिया विषयी सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व शासकीय भरती प्रक्रियेत जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असते. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यांनी संबंधित  विध्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन  प्रस्ताव पाठविण्याचे आव्हान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद वाघ होते. तर प्रमुख मार्गदर्शक सी के पाडवी होते.
         आपल्या अध्यक्षीय भाषणात वर्षात बोलताना प्राचार्य मिलिंद वाघ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आपले शिक्षण आणि भविष्यातील संधी सुरक्षित कराव्यात.
            या वेळेस मंचावर उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक,  कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाचे विभाग प्रमुख श्रीमती मेघा पाटील, ओ एस संजय पाटकर, नोडल अधिकारी समाधान खैरणार, महेंद्र सोनवणे दिनेश खैरनार उपस्थित होते. या वेळेस विध्यार्थ्यानी त्यांना जात पडताळणी विषयी विविध शंका उपस्थित केल्या. सदर शंकांचे निरसन पाडवी साहेबांनी केल्याने विध्यार्थी वर्ग समाधानी झाला. या जात पडताळणी मार्गदर्शन शिबिराचे प्रास्ताविक समाधान खैरनार यांनी तरआभार दिनेश खैरनार यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post