नवापूर सत्यप्रकाश न्युज
सालाबादप्रमाणे यंदाही श्री राम जन्मोत्सव समिती तर्फे श्री राम नवमी निमित्ताने राम जन्मोत्सव 6 एप्रिल रोजी साजरा होणार असून समीतीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सौ.नीतूबेन सुनील शर्मा या महिला रामभक्ता कडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली असून समीती तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचा आजपासून सुरुवात करण्यात आली असून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी,श्री गणेश मंदिराजवळ अर्जुन कार्यालय असलेल्या रज्जुभाई अग्रवाल यांच्या नुतन वास्तुत शहरातील प्रसिद्ध उद्योजक व सी.ए.नरेंद्रभाई अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरतभाउ गावीत, उद्योजक मनोज अग्रवाल,माजी नगराध्यक्ष सौ.हेमलता पाटील, प्रकाश पाटील,हरिष पाटील,चुनीलाल पाटील, राकेश राणा,दिपक वसावे,अजय वसावे , दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री राम,लक्ष्मण,सीता व हनुमान या श्रीराम दरबारच्या मुर्तीचे विधिवत पूजन पुजारी शार्दुल पाठक यांनी मंत्रोपच्चाराने उपस्थित मान्यवरांचा हस्ते जय श्रीरामाचा जयघोषात केली तर उपस्थितांचे रामायण व गमछा देउन सन्मान करण्यात आला. यावेळी आपल्या उद्घाटन पर मनोगतातून सी.ए.नरेंद्र अग्रवाल यांनी सांगितले की श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत असून शिक्षण विभागाने श्रीराम हा विषय आपल्या अभ्यासक्रमात ठेवून श्रीरामाची महती विद्यार्थ्यांना समजेल तसेच महाविद्यालयीन शिक्षणात देखील कला, वाणिज्य व विज्ञान विभागात देखील श्रीरामा वर विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा असे मत व्यक्त केले तर युवा मार्गदर्शक भरतभाउ गावीत यांनी देखील
आपल्या मनोगतातून प्रभु श्रीराम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून पहिलयांदा एवढया मोठया उत्सवाचे अध्यक्ष पदि मातृ शक्ती कडे दिल्याचा आनंद व्यक्त केला व सौ.नीतूबेन शर्मा हा उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करतील यात शंका नाही तर मातृशक्तीच्या कार्याचे कौतुक केले तर या वेळी 200 बालकांना श्रीराम बनवून त्यांना कार्यक्रमात सहभागी करण्याचे आवाहन केले तर माजी नगराध्यक्ष सौ.हेमलता पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा उत्सव आपल्या सर्वांचा असुन परिवारातील प्रत्येक सदस्याने कार्यक्रमात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण टिभे यांनी तर आभारप्रदर्शन सौ.नीतूबेन शर्मा यांनी व्यक्त केले या वेळी समीतीच्या पदाधिकाऱ्यांसह , शहरातील श्रीराम भक्त व मातृ शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
धार्मिक