1 एप्रिल पासून बॅंकिंग व्यवहारात मोठे बदल होणार

मुंबई सत्यप्रकाश न्युज.               देशभरातील बँकिंग क्षेत्रात 1 एप्रिल 2025 पासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होईल. सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट कार्ड, एटीएम वापर आणि डिजिटल बँकिंग यासंबंधी नवीन नियम लागू होणार असून, हे बदल जाणून न घेतल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. चला, हे नवे नियम काय आहेत ते थोडक्यात पाहूया!                                 1 एटीएम फीमध्ये वाढ.               भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना एटीएम इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी दिली आहे. यामुळे तुमच्या बँकेच्या नेटवर्कबाहेरील एटीएममधून पैसे काढणे किंवा बॅलेन्स तपासणे महाग होणार आहे. आता पैसे काढण्यासाठी 17 रुपयांऐवजी 19 रुपये शुल्क आकारले जाईल, तर बॅलेन्स चेक करण्यासाठी 6 ऐवजी 7 रुपये द्यावे लागतील.

2. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी बँका नवीन सुविधा आणत आहेत. ऑनलाइन बँकिंगमध्ये AI-आधारित चॅटबॉट्सचा वापर होईल, ज्यामुळे ग्राहकांना जलद सेवा मिळेल. सुरक्षेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणी यासारख्या सुविधा अनिवार्य होणार आहेत.                                    3. मिनिमम बॅलेन्सचे नवे नियम           SBI, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांसारख्या बँकांमध्ये मिनिमम बॅलेन्सशी संबंधित नियम बदलतील. तुमचे खाते शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण भागात आहे यानुसार मिनिमम बॅलेन्स ठरेल. जर खात्यात ठरलेली रक्कम नसेल, तर दंड आकारला जाईल.                                4. व्याजदरात बदल                1एप्रिलपासून सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिटवरील (FD) व्याजदरात बदल होणार आहेत. सेव्हिंग अकाउंटवरील व्याज मिनिमम बॅलेन्सवर अवलंबून असेल जितका जास्त बॅलेन्स, तितका जास्त परतावा. बँकांनी हे बदल ग्राहकांच्या फायद्यासाठी असल्याचे म्हटले आहे.या बदलांमुळे बँकिंग व्यवहारात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आताच हे नियम समजून घ्या, नाहीतर तुम्हाला अनावश्यक शुल्क किंवा दंड भरावा लागू शकतो!

Post a Comment

Previous Post Next Post