येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालयाला संस्थेचे सहसचिव श्री. मधुकर नाईक उर्फ दीपकदादा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे अमूल्य असे पन्नास ग्रंथ भेट दिले. या ग्रंथांमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी निश्चितच मदत होईल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल व ग्रंथपाल डॉ. राहुल तुपे यांनी श्री. मधुकर नाईक यांचे आभार मानले. संस्थेचे कार्याध्यक्ष व विद्यमान आमदार श्री. शिरिषकुमार नाईक आणि संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
Tags:
शैक्षणिक