. नवापूर सत्यप्रकाश न्युज
शहरातील शास्त्रीनगर भाग हा अत्यंत महत्त्वाचा व मोठा भाग असुन या भागातील बहुप्रतिक्षित असलेला मुख्य रस्ता नागरिकांच्या वेळोवेळी दिलेल्या निवेदने देऊन केलेल्या मागणी नंतर सदर रस्ता गेल्या वर्षी केला गेला रस्ता जरी नवीन असला तरी या रस्त्यावर धुळिचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पालिके द्वारे सफाई कामगार मात्र सफाईसाठी दिला जात नसल्याची खंत परिसरातील नागरिकांनाकडुन व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे सध्या मार्च अखेरीची घरपट्टी व पाणीपट्टी ची वसुलीची मोहीम हाती घेतली असून रखरखत्या उन्हात पालिका कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत नागरिकांकडून देखील योग्य प्रतिसाद मिळत आहे.
या भागात कित्येकदा सफाई कामगारांची मागणी केली असता कामगार कमी आहेत असे उत्तर दिले जात आहे विशेष या भागातील काही सफाई कामगार जातांना दिसतात मात्र सफाई करतांना दिसत नाही व परिसरातील नागरिकांनी सफाई का करत नाही असा प्रश्न केला तर आमची ड्युटी इकडे नाही दुसरया भागात आहे असे उत्तर देऊन खांद्यावर झाडु ठेवून सदर सफाई कामगार सरळ निघून जातात.
वेळोवेळी कर भरून सुध्दा जर परिसरातील सफाई होत नसेल तर पालिकेचा आरोग्य विभाग काय कामाचा असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.
सदर रस्त्यावर व रस्त्याच्या कोपऱ्यावर कचरा तर अटकतो परंतु धुळिने मात्र नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे परिसरातील नागरिक जरी आपले आंगण स्वच्छ ठेवतात तरी देखील वरून कचरा उडुन येतो व सफाई कामगार याकडे मात्र दुर्लक्ष करून पुढे निघून जातात हे चुकीचे असून यांच्यावर देखरेखीसाठी सुपरव्हायझर ठेवणे गरजेचे आहे तसेच धुळमुक्त मशीनचा वापर करून परिसर धुळ मुक्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे अन्यथा लवकरच जनआंदोलन करण्यात येईल असा सफाई ठेकेदार व आरोग्य विभागाला दिला आहे.
Tags:
सामाजिक