आयकर कायदा, १९६१ च्या कलम ४३(बी)(एच)नुसार, जर कोणत्याही व्यवसायाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपासून (MSME) घेतलेल्या सेवांसाठी किंवा मालासाठी पैसे देणे बाकी असेल, तर ते ३१ मार्चच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.
४३(बी)(एच) हे कलम MSME संदर्भात आहे – जर MSME नोंदणीकृत पुरवठादाराला (supplier) देय रकमांचे भुगतान ठराविक कालमर्यादेत झाले नाही, तर असा खर्च त्या वर्षाच्या कर गणनेत वजा करता येणार नाही.
देय तारीख महत्त्वाची आहे –
जर करारानुसार वेळ ठरलेली नसेल, तर १५ दिवसांत पेमेंट करणे आवश्यक आहे.
करारानुसार वेळ दिली असेल, तरी ती ४५ दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही.
३१ मार्चपर्यंत भरपाई झाली नाही, तर – तो खर्च त्या आर्थिक वर्षात वजा (deduct) केला जाणार नाही, आणि जेव्हा प्रत्यक्ष देयक दिले जाईल, तेव्हा तो खर्च वजा केला जाईल.
जर तुम्ही २०२४-२५ या आर्थिक वर्षात "एमएसएमई MSME पुरवठादाराकडून" मालखरेदी किंवा सेवा घेतली असेल, आणि त्याचे पेमेंट ३१ मार्च २०२५ पर्यंत केले नाही, तर तो खर्च २०२४-२५ मध्ये वजा केला जाणार नाही.
आणि, तो खर्च केवळ त्या आर्थिक वर्षात वजा होईल, ज्या वर्षात प्रत्यक्ष पेमेंट केले जाईल.
त्यामुळेच, MSME पुरवठादारांना ३१ मार्चपूर्वी पूर्ण पेमेंट करणे आवश्यक आहे, अन्यथा तो खर्च त्या वर्षाच्या कर गणनेत वजा करता येणार नाही. म्हणून, व्यापाऱ्यांनी दि.३१ मार्चपूर्वी उर्वरित MSME देयके निकाली काढावीत.
नितीन दत्तात्रय डोंगरे
अध्यक्ष - नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
-------------------------------------
आयकर कायद्याच्या कलम ४३ (ब) (ह) बाबत गेल्या वर्षी झालेला गोंधळ आणि त्रास यावेळीही कायम राहील आणि हे टाळण्यासाठी अशा करदात्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे पेमेंट त्यांच्या कर्जदारांना मार्च महिन्यातच करणे योग्य राहील.जेणेकरून ते या कलमाचे दुष्परिणाम टाळू शकतील.
या तरतुदीला काही अपवाद आहेत जसे की ते फक्त लहान आणि सूक्ष्म युनिट्सकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी लागू आहे आणि ही तरतूद व्यापारी किंवा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या वस्तूंना लागू होत नाही. याशिवाय, अंदाजे उत्पन्नावर रिटर्न भरणाऱ्यांनाही यातून सूट दिली जाईल आणि मध्यम आणि मोठ्या युनिट्समधून खरेदी केलेल्या वस्तूंवरही ही तरतूद लागू नाही.
मिताली जैन, चार्टर्ड अकौंटन्ट, धुळे
Tags:
करविषयक