धुळे व जळगाव जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून कायमस्वरूपी वेतन अधीक्षक नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेतन अधीक्षका अभावी वेळोवेळी रखडत आहेत. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याला कायमस्वरूपी वेतन अधीक्षक नेमण्याची आवश्यकता असून त्यासाठी अनेक शिक्षकांची व शिक्षक संघटनांनी याबाबत मागणी करून देखील अद्याप धुळे जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी वेतन आधीक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षकांचे दोन दोन, तीन तीन महिने पगार रखडले होते. तसेच मेडिकल बिले, फरक बिले व तातडीची आवश्यक निधीसाठी देखील अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे सध्या धुळे जिल्ह्याला जळगाव येथील वेतन अधीक्षक यांना तात्पुरता चार्ज देण्यात आलेला आहे. परंतु त्यामुळे शिक्षकांचे वेतन बिले वेळेवर अदा होत नाही त्यासाठी शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी काल राज्याचे शिक्षण संचालक श्री संपत सूर्यवंशी साहेब यांच्याकडे पुणे संचालक कार्यालय येथे जात धुळे जिल्ह्यासाठी कायमस्वरूपी वेतन अधिक्षक नियुक्त करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर राज्यातील विशेषतः नगर जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले शालार्थ आयडी व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या रोस्टर तपासणी संदर्भात देखील काल शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहाय्यक शिक्षण संचालक पानझडे साहेब तसेच पुणे येथील शिक्षण उपसंचालक यांची भेट घेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी चा व रोस्टर तपासणीच्या प्रश्नासंदर्भात विनंती करत, तात्काळ सदर प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी शुभांगी ताई पाटील यांच्यासह, गायकवाड प्रसाद बाबासाहेब
,तनपुरे अक्षय राजेंद्र , तनपुरे किरण सुरेश,शिरसाठ नानासाहेब,कुलकर्णी अक्षय बाळासाहेब ,करपे कुणाल विजय
भोंगळ किशोर बाबासाहेब आदी अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक