बातमीचा इफेक्ट. काल सत्यप्रकाश न्युज मध्ये प्रकाशित झालेल्या शास्त्रीनगर भागात सफाई कामगारांना आभाव या बातमीचा आज इफेक्ट झाला असून आज कामगारांनी सफाई केली....

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   काल सत्यप्रकाश न्यूज ने शास्त्रीनगर भागात सफाई कामगारांचा आभाव धुळिने नागरिक त्रस्त पालिका प्रशासन मात्र मस्त या हेड लाईन ने काल सायंकाळी बातमी प्रकाशित केली होती त्याचा परिणाम आज लगेच झाला असून अवघ्या 24 तासात आरोग्य विभागाकडून सफाई कामगार शास्त्रीनगर भागात पाठवून बरयापैकी रस्ता्याची सफाई केली असून सदर कामगारांनी बरिचशी बारीक माती व रेती ब्रशच्या साह्याने भरून बाहेर फेकली आहे पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून पालिका प्रशासन , आरोग्य विभाग व ठेकेदारांचे आभार मानले आहेत व या पुढे रोज सफाई कामगार पाठवून सफाई करून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post