अनुदानाच्या संदर्भात कोणीही कोणत्याही पोस्टवरून नैराश्य घेऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे - आ.ज्ञानेश्वर म्हात्रे

.  मुंबई सत्यप्रकाश न्युज 
   महाराष्ट्र राज्यातील अघोषित, अंशतः अनुदानित, टप्पा  वाढ शाळेतील शिक्षक शिक्षकेतर  बंधू भगिनींना  माझी विनंती आहे की, अनुदानाच्या संदर्भात कोणीही कोणत्याही पोस्टवरून   नैराश्य घेऊ नका, "आता हे होणारच नाही अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका"  मी सक्षमपणे आपल्यासाठी लढलेलो आहे, विधिमंडळामध्ये किमान सहा वेळा मी  माझ्या भाषणामध्ये  आपल्याविषयी तळमळीने बोललो पाठपुरावा केलेला आहे आणि पूर्ण ताकद लावून  लढत आहे, सर्व मंत्र्यांना  आपली बाजू समजावून सांगितलेली आहे, त्यांनीही समर्थन दाखवलेला आहे , येत्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याचा पाठपुरावा सुरू केलेला आहे*
       आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी  मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री  यांची परवानगी लागणार आहे, ती मिळावी याकरता  मी सर्व शिक्षक पदवीधर आमदारांना सोबत घेऊन जीवाचं रान करत आहे , कोणीही काळजी करू नये, उगाच मनात वाईट विचार आणून, ताण घेऊ नका, स्वतःची, आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपण निर्णय करूनच घेऊ.
      अघोषित शाळांना अनुदान  त्रुटी पूर्तता, टप्पा वाढ, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, आणि त्याच्या संदर्भातले विषय, तसेच जुनी पेन्शन  यासाठी  जोपर्यंत काम होत नाही , तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, आपल्या चळवळीतून पुढे गेलेला मी एक शिक्षक आहे , आपल्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांसाठी  सतत झटत राहणारच, आपल्या सर्वांची सकारात्मक साथ राहू द्या.
      उद्याच्या गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा

Post a Comment

Previous Post Next Post