भास आणि आभास.... याद्वारे आजार निर्माण होत असतात का? या विषयावर डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    आरोग्य धनसंपदा , आजीबाईचा बटवा 
विषय - भास आणि आभास.... याद्वारे आजार निर्माण होत असतात का? 
            मी सदाशिव पाटील. बुधवार पेठ कोल्हापूर .
    भास म्हणजे काय --भास म्हणजे कधीतरी आपणास काही तरी तंतोतंत खऱ्यासारखे वाटणे किंवा दिसणे पण प्रत्यक्षात ते कधी खरे नसते म्हणजे डोळ्यांची किंवा मनाने काहीतरी अनुभवने... असे सतत वाटते पण खऱ्या अर्थाने ते सत्य नसते. एक तर तो आभास भ्रम मनात निर्माण होतो.... कधी आपल्या नातेवाईक अथवा मित्रांनी सांगितलेले गोष्टी प्रसंग कथा या आपल्या मेंदूपर्यंत विचारांती दृढ होतात आणि आपण त्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे कृती करतो अवलंबन करतो म्हणून आपल्याला काल्पनिक प्रासंगिक तात्पुरते आजार व्याधी तयार होतात त्यांना मेडिकल शास्त्रात औषधी नसतात पण आपण भोदु वैद्य. डॉक्टर उपचार करणारे गावातील इतर व्यक्तींकडे जातो आणि तो आज ार नसतानाही वाढवून घेतो त्याचा परिणाम मेंदूवर होतो आणि आपण वैचारिक मानसिक आजारी पडतो 
             भास म्हणजे आकलन समजणे अथवा चुकीचा अर्थ समजून आभास निर्माण करणे हे त्याचे समानार्थी शब्द आहेत भास म्हणजे जाणीव होय.. मनुष्याची ज्ञान शास्त्रीय चेतना आत्मभान करणे यालाही भास असेच म्हणतात आपण स्वतः भोवतालची परिस्थिती यातील संबंध जाणण्याची प्रत्येकाची क्षमता स्वतःचा दृष्टिकोन विचार तसेच आपण स्वतः इतरांपासून कधी कधी वेगळे अस्तित्व निर्माण करतो आणि प्रत्यक्ष जाण्याची क्षमता नाही केल्यास आपणास शरीराला भास तयार होतो आणि आजारी पडतो किंवा एखादा मोठा विकार या भास आणि आभासाने तयार होतो.
मानस शास्त्रात मनाचे तत्त्वज्ञान मोठेअगाध आहे. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात... जर चैतन्य अवस्थेमध्ये बिघाड निर्माण झाला तर आजारपण येते चैतन्य अवस्था म्हणजे मन विचार मेंदू ब्रेन हे होत.... जर चैतन्यवस्थेमध्ये बिघाड निर्माण झालाच नाही तर आपणास कधीही आजारपण येणार नाही. कारण माणूस हा सतत कोणत्याही गोष्टीचा अति विचार करतो नेहमी नकारात्मक गोष्टी अगोदर शिकतो सकारात्मक गोष्टींचा तो करताना मना त भितो कारण मनुष्याच्या स्वभाव हा लाजाळू अबोल संशयी स्वार्थी डोंगी मतलबी आणि निगेटिव्ह थिंकिंग करण्याचा आहे त्यामुळे त्याला जीवनात प्रत्येक गोष्ट करताना भास होतो 
            उदाहरणार्थ आपण एखाद्या वेळी रस्त्यावर अथवा एसटी स्टँड अथवा रेल्वे स्टेशनवर गर्दीच्या ठिकाणी उभे राहिल्यास मागून कोणीतरी आपल्या नावाची आरोळी मोठ्याने मारीत आहे असा आपला भास होतो. पण मागे वळून बघतो पण आपणास कोणी दिसत नाही हा एक भाग झाला..... पण प्रत्यक्षात कोणीतरी कुठेतरी ती आरोळी मारलेली असते हा एक ध्वनीचा आवाज आपणास ओळखीचा वाटतो याला आभास असे म्हणतात. 
              भास निर्माण झाल्यास आपणास शारीरिक व्याधी तयार होते.... मनातील संकल्पना या त्या आजाराला कारणीभूत असतात याला निगेटिव्ह थिंकिंग नकारात्मक विचार असे म्हणतात. 
          जीवनात वय वाढतांना प्रसंगही वाढतात त्या प्रसंगातून जाताना व्याधी ही निर्माण होतात पण व्याधी या आपणास उपचाराद्वारे समूळ नष्ट करता येतात पण भास आणि आभास निर्माण झालेले आजार हे कधी बरे होत नाही त्यामुळे हा आजार तात्पुरत्या स्वरूपात असतो आपण समुउप्रदेशाने किंवा चांगल्या डॉक्टरांच्या कौन्सिलिंगने तो विकार बरा होतो बराच वेळा हा आजार मनो रुग्ण म्हणून जाहीर होतो याला कारण मनाची विकृत अवस्था होय त्यामुळे आपण नेहमी सकारात्मक गोष्टींचा विचार करावा.  
                 

Post a Comment

Previous Post Next Post