प्रत्येक घर तंटामुक्त व मोबाईल मुक्त करा: चंद्रकांत दादा मोरे

.  नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात मेळावा.. हितगुज व मार्गदर्शन नवापूर । प्रशिरपूर तालुक्यातील करवंद येथे गुरुमाऊलींच्या प्रमुख उपस्थितीत खानदेश स्तरीय महा सत्संग सोहळा दिनांक 26 रोजी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास खानदेशातील बहुसंख्य सेवेकरी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यासाठी नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजित मेळाव्यात चंद्रकांतदादा मोरे बोलत होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रकांतदादा मोरे यांचे नवापूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आगमन झाले.
  यावेळी केंद्र प्रतिनिधी निलेश सोनार व सी. भारतीताई सोनार यांनी पाद्यपूजन व औक्षण केले. त्यानंतर त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची दर्शन घेतले. त्यानंतर नवापूर केंद्र, तालुक्यातील साप्ताहिक केंद्र, सोनगड केंद्र या केंद्रातील प्रतिनिधी यांनी चंद्रकांत दादा मोरे यांच्या स्वागत सत्कार केला. 
   श्री मोरे पुढे म्हणाले की माणसाला माणसा सारखे वागण्यासाठी आध्यात्मिक गरज असते. माणसाच्या अंतकरणात संस्कार झाले पाहिजे. आताच्या पिढीच्या मनावर संस्कार होतात मात्र अंतकरणात होत नाही त्यामुळे आत्ताच्या पिढीला संस्कारक्षम बनवण्यासाठी आई-वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
    परमपूज्य गुरुमाऊली यांनी देश विदेशामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राच्या प्रसार व प्रचार केला आहे. या माध्यमातून 8 हजार केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी 15 कोटी भाविक आपली सेवा देत आहेत. श्री स्वामी समर्थ केंद्र कुठला ही भेदभाव पाळला जात नाही. महिलांना शंभर टक्के आरक्षण व संरक्षण केंद्रमार्फत दिले जात असते. अध्यात्म्याने धर्म क्रांती होते. व्यसनमुक्त होण्यासाठी केंद्राची आवश्यकता आहे. श्रीराम व शिवरायांची जयंती साजरी करत असताना त्यांचे विचारही आत्मसात करणे तेवढेच गरजेचे असल्याचे चंद्रकांत दादा मोरे यांनी सांगितले. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक रणधीरे यांनी तर सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले आभार संदीप चौधरी यांनी मानले. यावेळी नवापूर शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, महिलावर्ग यासह श्री स्वामी समर्थ केंद्रातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना थंडपेय वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post