. नवापूर - सत्यप्रकाश न्युज
आई सप्तशृंगी प्रतिष्ठाण पदयात्रा सेवा समितीच्या सेवा कार्याला २५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्ताने महाप्रसाद (जाहिर भंडारा) कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.आई सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले.
आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली आई सप्तशृंगी प्रतिष्ठाण पदयात्रा सेवा समिती तर्फे गेल्या २५ वर्षा पासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.रजत महोत्सवी वर्ष निमित्ताने बडोदा येथील जिग्नेश रमेश जाधव ह्यांचे तर्फे नवापूर वासियांसाठी महाप्रसादाचे ( जाहीर भंडारा) आयोजन श्रीराम मंदिर गल्लीत करण्यात आले होते.
आई सप्तशृंगी निवासिनी देवी गड मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांचे आगमन झाल्यावर गणपती मंदीर ते श्री.राम मंदिर पर्यंत भक्ति गीतांचा तालावर फटाक्यांच्या आतिष बाजीने भव्य स्वागत करण्यात आले.
तदनंतर श्री राम मंदीराजवळ आई सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आले. सुदर्शन दहातोंडे यांनी आई सप्तशृंगी प्रतिष्ठाण पदयात्रा सेवा समितीच्या सेवा कार्याबद्दल आपल्या मनोगतात कौतुक केले.
यावेळी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशवादी हल्याचा निषेध करीत सामुखिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी सुदर्शनजी दहातोंडे प्रशांत निकम,तुषार जाधव,निलेश बावके,योगेश बांगर,यांच्या आई सप्तशृंगी प्रतिष्ठाण सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव,सचिव शैलेष सैन,दर्शन पाटील,जिग्नेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रसंगी आई सप्तशृंगी निवासिनी देवी मंदिर ट्रस्ट तर्फे आई सप्तशृंगी प्रतिष्ठाण सेवा समितीचे पदाधिकारी हेमंत जाधव, शैलेष सैन,दर्शन पाटील,जिग्नेश जाधव,यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील,शिवसेना उप जिल्हाप्रमुख हसमुख पाटील,माजी नगरसेवक अजय पाटील,शंकर दर्जी,विजय सैन,राजू गावीत,महेंद्र दुसाणे,अनंत पाटील, विजय बागुल, मुकेश चव्हाण,चेतन चव्हाण आदि उपस्थितीत होते. सूत्र संचालन किरण टिभे तर आभार हेमंत जाधव यांनी मानले.
कार्यक्रम दरम्यान सुदर्शन दहातोंडे यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव व आई सप्तशृंगी प्रतिष्ठान सेवा समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट देवून देवीची प्रतीमा भेट दिली.
यशस्वितेसाठीआई सप्तशृंगी प्रतिष्ठाण पदयात्रा सेवा समिती तसेच मनोज बोरसे,आबा मोरे,रामू गिरासे,राहुल मराठे,दर्पण पाटील जितेंद्र अहिरे,बाळू टिभे राजू सिंधी,जिग्नेश पाटील,रवी पाटील,भूषण पाटील,हिमांशू पाटील, पिंकु पंचोली, मेहुल जोषी,अमोल पाटील,अमु पाटील,सुग्रीव पाटील,गोविंदा पाटील पवन पाटील आदींनी परिश्रम घेतले
Tags:
धार्मिक