येथे १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत नवापूर पंचायत समितीने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी देविदास देवरे यांनी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापर सक्तीबाबत शपथ दिली.
या उपक्रमांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करताना हेल्मेटचा वापर करण्याची शपथ घेतली. गट विकास अधिकारी देवरे यांनी सांगितले की, “सुरक्षित प्रवास हीच आपली प्राथमिकता असली पाहिजे. कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कार्यालयीन शिस्त आणि सामाजिक जबाबदारी या दोन्हींकडे लक्ष देत आहोत.”
Tags:
शासकीय