येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान समाधान शिबिर 2025 अंतर्गत जिल्हाधिकारी मिताली सेठी मॅडम यांच्या निर्देशानुसार नवापूर तालुक्यात महसूल मंडळ स्तरावर आणि विविध गावांमध्ये महाराजस्व शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, हे अतिशय स्तुत्य आणि नागरिकांसाठी उपयुक्त आहे.
आज, २५ एप्रिल २०२५ रोजी नवापूर तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय शिबिर यशस्वी झाले.
या शिबिरात तहसीलदार दत्तात्रय जाधव, निवासी नायब तहसीलदार प्रवीण मराठे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, नवापूर मंडळ अधिकारी संतोष जाधव यांच्यासह मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, महसूल सेवक, मंडळ अधिकारी, महा ई-सेवा केंद्र चालक आणि विविध विभागांचे कर्मचारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ यांचे सक्रिय योगदान उल्लेखनीय आहे.
शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे दाखले मिळाल्याने त्यांचे समाधान व्यक्त होत आहे, हे पाहून आनंद झाला. वितरित करण्यात आलेल्या दाखल्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
* सात-बारा उतारे – ६०
* खाते उतारे – ६०
* ड पत्रक – २७
* वारस अर्ज – ६
* पुरवठा अर्ज – ४२
* उत्पन्न अहवाल – ५३
* उत्पन्न दाखले – ५३
* जातीचा दाखला – ३
* संजय गांधी योजना अर्ज – ९
* आधार नूतनीकरण – ५
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेतला आणि त्यांना आवश्यक असलेले दाखले सहज उपलब्ध झाले. एकाच ठिकाणी विविध सुविधा मिळाल्याने नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची बचत झाली आहे.
अशा प्रकारचे शिबिर आयोजित करणे आणि नागरिकांना जलद गतीने सेवा पुरवणे हे प्रशासनाचे जबाबदारी आहे .
Tags:
शासकीय