आदर्श महाविद्यालय बदलापूरचा पदवी प्रमाणपत्र ( डिग्री) वितरण समारंभ संपन्न

    मुंबई सत्यप्रकाश न्युज 
   आज कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात उपस्थित राहून पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्राप्त केलेल्या पदवीधर शिक्षणाचे प्रमाणपत्र देऊन भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
       तसेच २०२५ – २६ चा आदर्श महाविद्यालचा " आदर्श प्रतिष्ठित विद्यार्थी" म्हणून आ. ज्ञानेश्वर म्हात्रे  यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
      यावेळी पालघरचे नामांकित सोनुभाऊ बलवंत कॉलेज चे प्राचार्य .किरण सावे , आदर्श महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ.संगीता पांडे  , संस्थेचे अध्यक्ष .उदय कोतवाल, उपाध्यक्ष जनार्दन घोरपडे , डॉ.चुरी मॅडम ,सचिव तुषार आपटे ,खजिनदार .रामचंद्र शेटे , पदवीधारक . एम गुरुप्रसाद , आदर्श शाळेचे प्राचार्य .रमेश बुटेरे  भोईर सर व इतर सर्व प्राध्यापक व मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post