येथील उबाठा शिवसेना गटातर्फे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करुन आंदोलन करण्यात आले. तसेच नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
नवापूर येथे उबाठा शिवसेना गटातर्फे बसस्थानकासमोर जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध
नोंदविण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, माणुसकीला काळिमा फासणारी घटना पाहलगामसारख्या संवेदनशील भागात दहशतवादी हल्ल्यामुळे घडली आहे. या हल्ल्याचा नवापूर येथे तीव्र निषेध करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, तालुकाप्रमुख कल्पित नाईक, शहरप्रमुख अनिल वारुडे, जिल्हा उपसंघटक मनोज बोरसे, तालुका संघटक देवका पाडवी, युवासेना जिल्हा उपप्रमुख दिनेश भोई, किसन शिरसाठ, प्रमोद वाघ, महेंद्र गावित, फिरोज शेख, मुसा काकर, सचिन चौधरी, पवन पाटील, दिनेश खैरनार, मनोहर चौधरी आदी उपस्थित होते.
Tags:
सामाजिक