ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक सहविचार सभा संपन्न ....

.    मुंबई सत्यप्रकाश न्युज 
     आज शनिवार दिनांक ०५/०४/२०२५ रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आ. श्री ज्ञानेश्वर म्हात्रे  यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक सहविचार सभा उत्तमरित्या पार पाडण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करत असताना शाळा, मुख्याध्यापक ,शिक्षक ,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
     यावेळी ठाणे जिल्हा माध्य.शिक्षणाधिकारी श्रीम. ललिता दहितुले  , शिक्षणाधिकारी श्री.मोहिते साहेब ,  उपशिक्षणाधिकारी श्री. घोरड  लेखाधिकारी श्री.दिलीप घनगाव  ,बालभवन सदस्य .श्री.प्रशांत भामरे  , श्री. संदीप पाटील सर , ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.गणेश पाटील सर, सचिव श्री.प्रवीण लोंढे सर, श्री
भरत वेखंडे सर तसेच तालुका अध्यक्ष श्री.जोहरे सर, श्री.भाई पष्टे सर,श्री.विजय राणे सर श्री.किरपण सर,श्री.अनिल पाटील सर, श्री.गणेश तळेले सर, श्रीम.देसले मॅडम, श्रीम.भालेराव मॅडम व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post