सालाबादप्रमाणे यंदाही
शहरात जय श्रीरामाचा गजरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रीराम नवमी निमित्ताने मंदिर व परिसरात सुशोभीकरण करण्यात आले होते तर सकाळपासूनच आपल्या आराध्य दैवत चे दर्शनासाठी श्रीराम भक्तांनी एकच गर्दी केली होती.
सकाळी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम मंदिरात महाआरती भरत गावीत व संगिता गावीत, अजय वसावे, अजय पाटील, हेमलता पाटील,उत्सव समितीचा अध्यक्षा नितुबेन शर्मा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, मनोज अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्रीरामाचा जय जयकार करण्यात आला श्रीराम मंदीरात भाविकांनी एकच गर्दी केली होती. तदनंतर संध्याकाळी श्रीराम मंदीरा पासून भव्य श्रीरामाची शोभायात्रा काढण्यात आली यात बाल गोपाल मंडळी यांनी श्रीरामाचा वेशभुषा १८० बालकांनी वेशभूषा साकारली होती. तसेच श्रीराम सीता हनुमानाचा सजिव देखावा तयार करण्यात आला होता. तसेच शोभायात्रेत आदिवासी नृत्य, गुजरात राज्यातील सोनगढ येथील मुलीनी मैदानी खेळ लाठी, तलवारबाजी सादर करून नागरीकांना मंत्रमुग्ध होते.
तसेच आदिवासी रुढी परपरा सांस्कृतीक देखावा, तसेच आदिवासी टिपरी नृत्य, शिवाजी महाराज सजिव देखावा भव्य शोभायात्रेत ठेवण्यात आला होता. युवक व युवती यांनी ढोलताशाचा गजरात जय श्रीरामाचा गजरात नाचण्याचा आनंद घेतला या शोभायात्रेचे श्रीफळ फोडून उदघाटन करण्यात आले. तदनंतर त्यांनी शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष गिरीष गावीत, सेवानिवृत पोलिस निरीक्षक अजय वसावे, सह माजी नगरसेवक श्रीराम जन्मोत्सव समितीचा पदधिकारी यांनी पण शोभायात्रेत नाचण्याचा आनंद घेतला. शोभायाआ श्रीराम मंदीरा पासून निघाली. सरदार चौक, लाईटबाजार, शिवाजी रोड फिरत श्रीराम मंदीरा जवळ शोभायात्रेची सांगता करण्यात आली.
शहरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच संध्याकाळी ७.३० वाजता श्रीराम मंदीराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दि ६ एप्रिल २०२५ श्रीराम मंदीरा समोर श्री सुंदरका पाठ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या अध्यक्षा नितुबेन सुनील शर्मा शर्मा, उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, संजय गावीत, मनोज अग्रवाल, अनिल वळवी, अजय अग्रवाल, राजु गावीत, ललित चौधरी, शंकर दर्जी, अजय परदेशी जितेंद्र अहिरे, कमलेश छत्रीवाला, रज्जु अग्रवाल, गोविंद मोरे, दर्शन दिपक पाटील, किरण टिभे हेमंतभाई शाह, दिपक प्रजापती,विजय बागुल, कमलेश पाटील, अनंत पाटील राजेश अहिरे सह
समितीचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले या शोभायात्रेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस बांधव व गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार किरण टिभे यांनी व्यक्त केले.
Tags:
धार्मिक