शहरातील महात्मा जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीनिमित्त सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर व समस्त आंबेडकर अनुयायींतर्फे जाहीर प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम १२ एप्रिलला सायंकाळी सहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शिवदास नगराळे, अॅड. राहुल शिरसाठ यांनी केले आहे.
Tags:
सामाजिक