महिलांबाबत धुळे एस टी महामंडळ उदासीन, उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीचा विभाग नियंत्रक गीतेना घेराव

.  धुळे सत्यप्रकाश न्युज 
    महिला सुरक्षा व हिरकणी कक्षा बाबत धुळे एस टी महामंडळ विभाग कमालीचा उदासीन असून याबाबत मागील महिन्यात शिवसेना उ.बा.ठा महिला आघाडीने धुळे बस स्थानकातील हिरकणी कक्षाचे स्टिंग ऑपरेशन करून वाभाडे काढले होते. याबाबत महिला आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन बस स्थानकातील महिला सुरक्षा विषयी आढावा घेतला होता. त्यावेळी धुळे बस स्थानकातील हिरकणी कक्षाची अत्यंत दुरावस्था झाल्याचे पाहण्यात आले होते, चार बाय चारच्या पत्राट अंधार खोलीत हिरकणी कक्ष तयार करण्यात आला असून त्यात प्रचंड धूळ व घाण साचलेली होती. त्याचप्रमाणे तेथील लाईट व पंखे देखील बंद होते, बसण्याची धड व्यवस्था नव्हती अशा अवस्थेत कोणतीही स्तनदा माता एवढ्या अस्वच्छ जागी आपल्या बाळाला दूध पाजणे कदापि शक्य नाही! अशी परिस्थिती असताना त्याचबरोबर महिला सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी आढळून आल्या नव्हत्या. याबाबत महिला आघाडीच्या पदाधिकारी व उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांनी त्यावेळी आगारप्रमुख देवरे यांची भेट घेत सदरचा हिरकणी कक्ष तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर महिला सुरक्षा बाबत उपाययोजना करण्याची देखील त्यावेळी मागणी केली होती. याबाबत वर्तमानपत्र,टीव्ही चॅनल व सोशल मीडियातून देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. व त्यावेळी आगार प्रमुख देवरे यांनी तात्काळ हिरकणी कक्षाची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले होते. परंतु त्यानंतर सुमारे एक दीड महिना उलटून गेला तरी देखील परिवहन महामंडळ महिला सुरक्षित बाबत उदासीन असल्याचे दिसून आले. वर्तमानपत्रातून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील त्याची कोणतीही लाज व तमा न बाळगता प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई न केल्याचे निदर्शनास आल्यामुळे काल शिवसेना उ.बा.ठा महिला आघाडीच्या उपनेत्या शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागाचे विभाग नियंत्रक गीते साहेब यांना घेराव घालत याबाबत जाब विचारला. स्तनदा मातांना निरोपयोगी ठरलेल्या अत्यंत दयनीय अवस्था असलेल्या हिरकणी कक्षाला जर तात्काळ दुरुस्त करण्यात आले नाही तर मात्र शिवसेना स्टाईल मध्ये सदरचा कक्ष तोडून फेकण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे त्याचबरोबर महिला सुरक्षिततेबाबत देखील खंबीर देणे दखल घेण्याची यावेळी विभाग नियंत्रक यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.
   याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्यासोबत संगीताताई जोशी, डॉ जयश्री ताईवानखेडे  व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post