गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी नवापूरमध्ये स्थापन झालेला रेंटिओ तुवरदाळ ब्रँड अजूनही लोकांची पहिली पसंतीची असुन यापुढे देखील अशीच राहणार आहे.
नवापूर येथील कारखान्यातून दररोज ८० ते ९० मेट्रिक टन दाळीचे उत्पादन होते. रेंटिओ तूवर दाळ केवळ महाराष्ट्र, गुजरात किंवा भारतातच नाही तर परदेशातही निर्यात केली जाते. तूवर दाळ हे नाव आले की, सर्वात आधी मनात येणारे ब्रँड नाव म्हणजे रेंटिओ तूवर दाळ होय जे उल्लेखनीय आहे. आज रेंटिओ ब्रँडने आपल्या प्रवासाची ९० वर्षे पूर्ण केली आहेत आणि या मैलाचा दगड साजरा करण्यासाठी ते एक भव्य उत्सव घेऊन येत आहेत. यानिमित्ताने, अहमदाबादमधील हॉटेल हयात वस्त्रपूर येथे रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रेंटिओ तुवरदाळच्या सीईओ श्रीमती शीतल वाणी/ चोखावाला म्हणाल्या की, रेंटिओ तुवर दाळ या ब्रँडची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वी गुजरात आणि महाराष्ट्राच्या फाळणीपूर्वी १९३५ मध्ये झाली त्यावेळी उत्तर महाराष्ट्राचा भाग असलेल्या नवापूरमध्ये झाली होती.15 कामगारांवर सुरू झालेल्या कंपनीत आज सुमारे 150 लोक काम करत असुन यांचा आम्हाला आनंद आहे आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील उपयोग करत असुन भविष्यात कंपनीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न आहे.
देसी तूवर दाळ साठी रेंटिओ हा एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय आहे. लोक गेल्या चार पिढ्यांपासून रेंटिओ तुवरदाळचा आनंद घेत आहेत, जे या ब्रँडचे यश दर्शवते. या वर्षी, रेंटिओ तूवर दाळ ब्रँड ९० वर्षे पूर्ण करत असुन कंपनी हा मोठा टप्पा साजरा करत आहे.
म्हणूनच आज हॉटेल हयात येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये रेंटिओ ब्रँडशी संबंधित वितरक, व्यावसायिक आणि काही खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.हा कार्यक्रम रेंटियो तुवरदाळ यांच्या ९० वर्षांच्या प्रवासाचे सादरीकरण करत आहे.
रेंटिओ तूरडाळ बद्दल थोडेसे :-
सन १९३५ मध्ये महाराष्ट्रातील नवापूर येथे कंपनीची स्थापना झाली असून येथे दररोज ८० ते ९० मेट्रिक टन दाळिचे उत्पादन होत होते एवढेच नव्हे तर तूवरदाळसह ज्वारी, मूग, हरभरा आणि इंद्रायणी तांदूळ यांचे देखील उत्पादन होत आहे .
नवापूरची दाळ केवळ भारतातच नव्हे तर यूके, यूएसए, कॅनडा, सिंगापूर आणि दुबई सारख्या देशात निर्यात केली जात आहे भारत, यूके आणि यूएसए मध्ये ब्रँड म्हणून नोंदणीकृत असलेली एकमेव अशी रेंटियो तुवरदाळ असुन आज या दाळिने ९० व्या वर्षात यशस्वी वाटचाल सुरू आहे या निमित्ताने रेंटियो चे मालक व माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला , कंपनीच्या सीईओ
सौ.शितलबेन वाणी/चोखावाला आणि सहकार्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे.
Tags:
सामाजिक