नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात

.   नंदुरबार सत्यप्रकाश न्युज 
     जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलिस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचता यावे यासाठी करण्यात आला आहे.
    यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकांद्वारे होत असे. परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्य नारिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून, अधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलीसांशी सतत संपर्क साधता येईल.

या उपक्रमाबाबत बोलताना नंदुरबारचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले, "नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी पोलिसिंगच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या मोबाईल क्रमांकांच्या साहाय्याने नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक कार्यक्षम प्रतिसाद पोलीस दलाकडून मिळेल."हे अधिकृत मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर व अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रसिद्ध केले जातील, जेणेकरून नागरिकांना ते सहज उपलब्ध होतील. यामुळे केवळ संपर्क सुलभहोणार नाही तर मोबाईलद्वारे होणाऱ्या अधिकृत संवाद, माहिती देवाण-घेवाण आणि नागरिकांशी होणारे व्यवहार हे आता संस्थात्मक स्वरूपात सुरक्षित राहतील.
 नंदुरबार जिल्हा पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी, पारदर्शक आणि तंत्रस्नेही पोलिसिंगसाठी सदैव कटिबद्ध आहे.
 अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाची यादी याप्रमाण -

Post a Comment

Previous Post Next Post