नवापूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्राध्यापक डॉ दीपक जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज प्राचार्य पदाच्या पदभार डॉ. ए जी जयस्वाल यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी संस्थेचे सचिव तानाजीराव वळवी,उपाध्यक्ष हरीश अग्रवाल, कोषाध्यक्ष आरिफ बलेसरिया, सहसचिव अजित नाईक, सहसचिव अजय पाटील, संचालक दीपक वसावे, सेवानिवृत्त प्राध्यापक आर डी पाटील आदी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांनी नवागाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुरूपसिग नाईक व धीमीबाई नाईक त्यानंतर नवापूर येथे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. व आभार मानले.पदभार स्वीकारल्यानंतर प्राचार्य दीपक जयस्वाल यांनी महाविद्यालयाच्या परिसरात 51 रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगितले शैक्षणिक गुणवत्ता त्याचप्रमाणे विद्यार्थी व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
Tags:
शैक्षणिक