आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात बद्धकोष्ठता म्हणजे काय या विषयावर डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी, नाशिक.....

  नाशिक सत्यप्रकाश न्यूज 
     आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईचा बटवा
       मी नलिनी थोरात वय 62 वर्ष. माझे नेहमी पोट साफ होत नाही. भरपूर बद्धकोष्ठता आहे याविषयी सर्वसाधारण माहिती दया 
       विषय - बद्धकोष्ठता म्हणजे काय
     आपण सजीव आहोत . म्हणजे जे अन्न हवा पाणी घेतात त्यांना सजीव म्हणतात. जे घेत नाही त्यांना निर्जीव म्हणतात. आपल्याला अन्न तोंडात घेताना दातांमध्ये बारीक करून जिभेवरती लाळ त्यात एकत्र करून अन्ननलिकेमधून ते जठरात झाईम्स  (रेनिन .पेप्सिन ईरेप्सिन )एकत्र होऊन लहान आतड्यात आत्ररस मोठया आतडयात आणि शेवटी गुदद्वारातुन शरीराबाहेर मल/विष्टा  स्वरूपातून बाहेर जाते. हे जाताना जर शरीरात पाणी पिण्याचे प्रमाण कमी त्यात फायबरयुक्त पदार्थ किंवा गोड मवाळ अथवा पिष्टमय पदार्थ सतत जेवणात आली तर बद्धकोष्ठता आपणास निर्माण होते. 
             बद्धकोष्ठता निर्माण होण्याची बरीचशी कारणे असतात . म्हणजे संडासाला अथवा मल विसर्जन करण्यास जास्त जोर द्यावासा वाटतो किंवा कुथावेसे वाटते. किंवा संडासाला होताना वेदना होतात. मल विसर्जन करण्यास बराच त्रास होतो. कधी कधी तर दोन-तीन दिवस संडासाला पोहोचत नाही .सतत गुरुद्वारावर प्रेशर द्यावेसे वाटते . पोटात संडास लागली असा भास होतो. पण गेल्यावर मोकळी आणि साफ होत नाही हे प्रत्येकाच्या शरीराच्या वागण्यातून अथवा खाण्यापिण्याच्या सवयीप्रमाणे होत असते. काही व्यक्ती तर आठवड्यातून फक्त तीन वेळा मला विसर्जन करतात. जर आपण रोज शौचाला ठरलेल्या वेळेप्रमाणे नियमित संडासला गेलो नाही तर आपणास बद्धकोष्ठता आहे. असे समजावे बराच वेळा संडासाला बसल्यावर एकसारखे गुदद्वारावर प्रेशर देऊन अथवा जोर देऊन संडास करावीशी वाटते. पण शौचाला साफ होत नाही. काही वेळा संडासला खडा संडास म्हणजे घट्ट संडास होते. अशावेळी  गुदद्वाराचे स्नायू हळूहळू रोज गुंतल्याने जास्त जोर दिल्याने शरीराच्या बाहेर येऊन त्यातील बारीक बारीक ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्या ब्रेक होतात . त्या तुटल्यामुळे आतील स्नायू बाहेर येऊन त्यांना पाणी लागले तर आग होते आणि संडास झाल्यानंतर त्यांना आत पूर्वत येण्यास बराच वेळ लागतो तेथे वेदना होऊन सूज येते आणि खाज येते बसताना त्रास होतो त्याला आपण मुळव्याध बवासीर असे म्हणतो. 
           बुद्धकोष्ठतेची लक्षणे
        १) जेव्हा आतड्यामध्ये तोंडाद्वारे अन्ननलिकेतून जठराद्वारे अन्न येताना त्यात लाळ + अन्न+यकृतातून पित्त रस+स्वादुपिंडातून स्वादुपिंड रस+पित्ताशयातून पित्त रस+जठरातून रेनिन पेप्सीन ए रेप सीन एकत्र लहानाआतड्यात पाझरतात. त्यामध्ये आंतररस पाझरतो
अशावेळी काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता असेल तर आतड्याची हालचाल नेहमीपेक्षा कमी होते कारण पचनशक्ती बंद होणे अति विचार टेन्शन बादरेशन. ताण तणाव असमाधान याचा परिणाम आपल्या पचनशक्तीच्या पाझरणाऱ्या रासायनिक द्रव्यावर होतो 
२) म्हणून नेहमीपेक्षा आतड्यावरती वारंवार ताण पडतो. 
 ३) आपण जेवण करताना पाणी कमी पितो अथवा जेवणानंतर कमी पाणी पितो त्यामुळे बद्धकोष्ठता निर्माण होते. 
 ४) शरीरातील स्रवणाय्रा एन्जॉयन्स चे प्रमाण कमी झाल्याने आतड्यावर ताण पडून बद्धकोष्ठता वाढते. 
 ५) बद्धकोष्ठतेमुळे आतड्याचे ब्लॉकेजेस वाढतात जणू काही तुमच्या आतडे पूर्णपणे रिकामी झाले नाही असे शौचाला गेल्यानंतर वाटते. असा भास आपल्या मनाला होतो.
            बुद्धकोष्ठतेची कारणे
      १) जर माणसाने दिवसभरामध्ये अन्ना सोबत पाणी फारच कमी प्याला अथवा शरीरात पाणी कमी झाल्यास आपल्याला बद्धकोष्ठता तयार होते. 
       २) जेवताना किंवा आपल्या आहारात सतत पिष्टमय पदार्थ वातूळ पदार्थ फायबर चे पदार्थ अति गोड सतत मवाळ खाल्ले तर संडासला साफ होत नाही म्हणजेच बद्धकोष्ठता वाढते. 
         ३) व्यक्तीने रोज आपल्या शरीराची हालचाल दैनंदिन काम व्यायाम सतत सहा सात किलोमीटर चालले अधून मधून योगा करणे गप्पा मारणे असे नाही केले तर बद्धकोष्ठता वाढते. 
         ४) आपल्याला गरज असताना संडासला जाण्याचा कंटाळा करणे किंवा लागल्यानंतर त्या ठिकाणी संडासची समाधानकारक व्यवस्था नसली तर संडास केला नाही तर बद्धकोष्ठता वाढते. 
         ५) जीवनातील ताण तणाव . सतत वैचारिक टेन्शन असमान प्रेशर अथवा घरातील चार भिंतींची वातावरण निर्मिती किंवा मनामध्ये असमाधान किंवा दारूचे जास्त सेवन झाल्यामुळे संडासला जाण्याचा कंटाळा येतो म्हणून बद्धकोष्ठता वाढते. 
         ६) कधी कधी स्त्रियांमध्ये गर्भारपणा राहिल्याने किंवा काही सतत च्या गोळ्या/ वेदना शामक गोळ्या/ लोहाच्या गोळ्या खाल्ल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते. 
          ७) काही व्यक्तींमध्ये थायरॉईड . पार्कीसन्स. किंवा सतत जीवनात नैराश्य ताण तणाव टेन्शन असल्यास पचनसंस्थेमध्ये बोवेल इरिटेबल सिंड्रोम किंवा सेलीअंक आजार निर्माण होऊन बद्धकोष्ठता निर्माण होते. 
          ८) कधी पोटात कृमी/ जंत निर्माण झाल्यास बद्धकोष्ठता निर्माण होते. 
           बद्धकोष्ठता निदान
         १) डॉक्टरांनी अगोदर पेशंटचा कौटुंबिक इतिहास त्यातील भूतकाळ आणि वर्तमान काळाची लक्षणे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. 
           २) पेशंटची रोजची त्याचबरोबर आठवड्याची सरासरी जीवनशैली विचारावी. 
           ३) आपल्या जीवनातील चालू असलेली ऍलोपॅथी औषध किंवा पूरक औषधी अथवा आहारातील जीवनसत्व याची माहिती सविस्तर विचारावी. 
           ४) पेशंट ची विष्टा पॅथॉलॉजिस्ट कडे तपासावी. रक्त लघवीचे रिपोर्ट . पोटाची सोनोग्राफी आणि अल्ट्रा सोनोग्राफी करावी गुदद्वाराची तपासणी करावी.
           ५) पेशंटला रोज पाच सहा किलोमीटर फिरण्यास सांगून वजन कमी करण्याचा सल्ला द्यावा. 
             ६) तंबाखू .चुना. ड्रिंक . अल्कोहोल. चरबी युक्त पदार्थ जेवणात घेऊ नये असा सल्ला द्यावा. 
            ‌७) पेशंटचा कौटुंबिक इतिहास नेहमी विचारावा. 
           बद्धकोष्ठता उपचार
       १) पेशंटला रोज सकाळी तोंड धुतल्यानंतर दोन ग्लास पाणी आणि रात्री झोपताना एक ग्लास पाणी आणि दिवसभर तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे सांगावे. 
        २) शरीरातील आतड्यांना आराम मिळण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस एक वेळचा निरंकट उपास करण्यास सांगावे. 
        ३) नेहमी आपल्या शरीराची हालचाल दैनिक कार्य करून भरपूर चालण्याचा सल्ला द्यावा. 
        ४) रोज सकाळी नेहमी नियमित ठरलेल्या वेळी शौचाला जावे. 
         ५) संडासाला कधीही जोर. प्रेशर .दाब .फोर्स देऊ नये. 
        ६) नेहमी जेवणात समतोल आहार घ्यावा जास्त गोड मवाळ किंवा अति मसालेदार .चरबीयुक्त सतत खाऊ नये. 
        ७) जीवनात आपण कसे खावे. किती खावे. कोणी खावे. हे प्रत्येक व्यक्तीला वयानुसार समजते नेहमी अति तेथे माती... म्हणजे आपणास वयानुसार कोणताही विकार लवकर होऊ शकतो. 
           बद्धकोष्ठता औषधी
          १) बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी ऍडजेक्टिव्ह मेडिकल औषधे / एखादे आयुर्वेदिक चूर्ण/आयुर्वेदिक गोळ्या/पचनासाठी एंजाइम्सच्या गोळ्या अथवा पातळ औषधे रात्री झोपताना घ्यावे. 
          २) पोट साफ होण्यासाठी रेचक म्हणून आठवड्यातून एकदा एरंडेल तेल चहा कॉफीमध्ये घ्यावे. 
         ३) एखाद्या वेळी प्रत्येक सामान्यांनी जंताची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्यास हरकत नाही. 
        ४) कधी कधी मीठ लिंबू खाता सोडा यांचे एकत्र मिश्रण करून घ्यावे. कधी रात्री झोपताना संसळखार/ काळे मीठ घेऊ शकतात. अथवा युनो पावडर एक ग्लास पाण्यामध्ये घेऊ शकतात. 
       ५) पचनासाठी ग्लुकोज पावडर किंवा लॅक्टोज पावडर यावी. लहान बाळांना ओवा झोपा चा अर्क देऊ शकतात. 
      बुध्दकोष्ठता वाढल्याने काय होते?
         १) मुळव्याध होतो. आजूबाजूला फिशर होतात. 
         २) गुदद्वाराला संडासाच्या वेळी प्रेशर / दाब दिल्याने त्वचेवर भेगा पडतात तेथील बारीक बारीक रक्तवाहिन्या फुटतात त्यामुळे तेथे जखम होते. 
         ३) गुदद्वारजवळ मासल पेशीच्या गाठी येतात तेथे खाज सुटते वचका येतो. त्या मासल पेशी ची होते. त्याला बवासीर पाइल्स मुळव्याध असेही म्हणतात. 
        ४) संडासाला जाताना गुद्वाराला जास्त खाज येते जखमा होतात त्यामुळे रेक्टल अल्सर सिंड्रोम होऊन आतड्यात मल साठतो.
        ५) जास्तीचे वाढलेले स्नायू मसल्स यांचे ऑपरेशन करावे लागते. असे दर आठ वर्षांनी होतच असते. 
         ६) यामुळे मूत्रमार्गात असह्यम आणि मलमार्गात असयम निर्माण होते. हे बद्धकोष्ठतेमुळे मुळव्याध / फिशर इत्यादी आजार व्यक्तीला होत असतात. 
         ७) आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन बद्धकोष्ठता या आजाराची औषध घेऊ शकतात. 
                       

Post a Comment

Previous Post Next Post